मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  World Cup: इंग्लंडचा वर्ल्डकपमधील दुसरा विजय, पाहा थरारक सामन्याचे खास फोटो

World Cup: इंग्लंडचा वर्ल्डकपमधील दुसरा विजय, पाहा थरारक सामन्याचे खास फोटो

Nov 08, 2023, 11:25 PMIST

एकदिवसीय विश्वचषकाच्या ४०व्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नेदरलँड्सला पराभूत केले.

  • एकदिवसीय विश्वचषकाच्या ४०व्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नेदरलँड्सला पराभूत केले.
बेन स्टोक्सचे शतक आणि त्यानंतर मोईन अली आणि आदिल राशीद यांच्या प्रत्येकी तीन-तीन विकेटच्या जोरावर इंग्लंडने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. इंग्लंडचा हा विश्वचषकातील दुसरा विजय ठरला. याचबरोबर पराभवासह नेदरलँड्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
(1 / 5)
बेन स्टोक्सचे शतक आणि त्यानंतर मोईन अली आणि आदिल राशीद यांच्या प्रत्येकी तीन-तीन विकेटच्या जोरावर इंग्लंडने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. इंग्लंडचा हा विश्वचषकातील दुसरा विजय ठरला. याचबरोबर पराभवासह नेदरलँड्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.(AP)
पुण्यातील खेळपट्टी पाहून इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडचा संघ वेगळ्या अंदाजात दिसत होता. जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागिदारी झाली. त्यानंतर त्यांनी दुसरी विकेट ८५ धावांवर गमावली.
(2 / 5)
पुण्यातील खेळपट्टी पाहून इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडचा संघ वेगळ्या अंदाजात दिसत होता. जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागिदारी झाली. त्यानंतर त्यांनी दुसरी विकेट ८५ धावांवर गमावली.(England Cricket Twitter)
इंग्लंडच्या तडाखेबाज फलंदाजीनंतर नेदरलँड्सच्या संघाने जोरदार कमबॅक केले. मात्र, त्यानंतर बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांच्यात सातव्या विकेटसाठी १२९ भागिदारी झाली. शेवटच्या काही षटकात दोघांनी फटकेबाजी केली.
(3 / 5)
इंग्लंडच्या तडाखेबाज फलंदाजीनंतर नेदरलँड्सच्या संघाने जोरदार कमबॅक केले. मात्र, त्यानंतर बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांच्यात सातव्या विकेटसाठी १२९ भागिदारी झाली. शेवटच्या काही षटकात दोघांनी फटकेबाजी केली.(Nitin Lawate)
बेन स्टोक्स इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ८४ चेंडूत १०८ धावा ठोकल्या. यासह स्टोक्सने एकदिवसीय विश्वचषकातील त्याचे पहिले शतक झळकावले आहे.
(4 / 5)
बेन स्टोक्स इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ८४ चेंडूत १०८ धावा ठोकल्या. यासह स्टोक्सने एकदिवसीय विश्वचषकातील त्याचे पहिले शतक झळकावले आहे.(AFP)
इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सच्या संघाची सुरुवात खराब झाली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वोक्सने सलामीवीर मॅक्स ओ'डॉडला ५ धावांवर आणि डेव्हिड व्हिलीने कॉलिन अकरमनला शून्यावर झेलबाद केले.
(5 / 5)
इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सच्या संघाची सुरुवात खराब झाली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वोक्सने सलामीवीर मॅक्स ओ'डॉडला ५ धावांवर आणि डेव्हिड व्हिलीने कॉलिन अकरमनला शून्यावर झेलबाद केले.(ECB)

    शेअर करा