मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Astro Tips : झटक्यात होईल प्रमोशन, उत्पन्नात होईल वाढ, करा हे सोपे उपाय

Astro Tips : झटक्यात होईल प्रमोशन, उत्पन्नात होईल वाढ, करा हे सोपे उपाय

Apr 26, 2023, 07:18 AMIST

Astro Remedies for job: कितीही प्रयत्न केला तरीही कधीकधी आपल्याला आपल्या नोकरी-व्यवसायात अपेक्षित वाढ पाहायला मिळत नाही. अनेकदा तर खूप कष्ट घेऊनही नोकरीत निराशा हाती येते. मग अशावेळेस काही सोपे उपाय केल्यास या समस्येतून मार्ग निघू शकतो.

नोकरीत आपण सर्वस्व झोकून देतो. आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळाल्यावर आपण जास्त काळ कामही करतो. मग अशात अनेकदा असं होत की जिद्दीने काम करूनही आपल्याला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळत नाही. मग अशावेळेस काही ज्योतिषशास्त्रातले अत्यंत सोपे उपाय केल्यास त्याचं अपेक्षित फळ आपल्याला मिळू शकतं. असे कोणते ज्योतिषिय उपाय आहेत जे केल्याने आपल्याला नोकरीत प्रगती मिळू शकते ते आपण पाहाणार आहोत.
(1 / 6)

नोकरीत बढती हवी असेल तर आपल्या कुंडलीच्या दशम म्हणजेच दहाव्या स्थानावर असणाऱ्या ग्रहाचा जप करावा. दहावं स्थान हे या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं मानलं जातं.
(2 / 6)

नोकरीत अपेक्षित यश मिळत नसल्यास आपल्या कुंडलीत तर काही दोष नाही ना हे एकदा तपासून पाहावे. समस्या असल्यास नवग्रह यज्ञ किंवा नवग्रह शांती करावी.  नवग्रह यज्ञ आणि अभिषेक केल्यानेही राहू-केतू दोषांपासून मुक्ती मिळते. 
(3 / 6)

सूर्याला अर्ध्य देणं हेही खूप शुभ मानलं जातं. जर तुम्हाला नोकरीत काहीही अडथळे येत असतील तर सकाळी सूर्याला अर्ध्य देणं अत्यंत शुभ मानलं जातं. सूर्य हा ग्रहांचा राजा मानला गेला आहे. असात सूर्याच्या प्रभावाने सकारात्मक उर्जा मिळते. 
(4 / 6)

शनि हा कर्मफल देणारा किंवा न्याय करणारी देवता म्हणून ओळखली जाते. शनिची कृपा आपल्यावर असावी आणि रोजगारात प्रगती व्हावी यासाठी शनिवारी शनि मंदिरात दिवा लावावा. शनिचा जप करावा. असं केल्याने रोजगारातल्या समस्या दूर होण्यास मदत होते.
(5 / 6)

श्री यंत्र व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी स्थापित करा. हे यंत्र अत्यंत शुभ परिणाम देत असल्याचं सांगितलं जातं. रोज या यंत्राची पूजा करा याच्या सकारात्मक प्रभावामुळे धन, समाधान आणि आर्थिक नुकसानीचे संकट दूर होते. याशिवाय ते व्यवसाय भागीदारी आणि व्यवसाय विस्तारातही मदत करते.
(6 / 6)

    शेअर करा