मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Team India: हार्दिक, धोनी, विराट...टीम इंडियाचे क्रिकेटपटू किती शिकलेत माहितीय का?

Team India: हार्दिक, धोनी, विराट...टीम इंडियाचे क्रिकेटपटू किती शिकलेत माहितीय का?

Dec 05, 2022, 07:31 PMIST

Team India Cricketrs Educational Qualifications: भारतीय क्रिकेटपटूंच्या करिअरबरद्दल अनेकांना खूप गोष्टी माहीत आहेत. कोणाच्या किती धावा आहेत, किती शतके आणि किती अर्धशतके आहेत? हे आकडे अनेकांना माहीत असतात. पण तुमचे आवडते क्रिकेटपटू किती शिकलेत हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना.. तर मग आम्ही या ठिकाणी तुम्हाला हेच सांगणार आहोत की, तुमचे फेवरेट क्रिकेटपटू किती शिकलेले आहेत.

  • Team India Cricketrs Educational Qualifications: भारतीय क्रिकेटपटूंच्या करिअरबरद्दल अनेकांना खूप गोष्टी माहीत आहेत. कोणाच्या किती धावा आहेत, किती शतके आणि किती अर्धशतके आहेत? हे आकडे अनेकांना माहीत असतात. पण तुमचे आवडते क्रिकेटपटू किती शिकलेत हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना.. तर मग आम्ही या ठिकाणी तुम्हाला हेच सांगणार आहोत की, तुमचे फेवरेट क्रिकेटपटू किती शिकलेले आहेत.
Rohit Sharma- सर्वप्रथम आपण शर्मा जी का लडका म्हणजेच कर्णधार रोहित शर्माचे शिक्षण काय झाले आहे. ते जाणून घेऊया. रोहितने २००७ मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. रोहितने १२वीपर्यंत शिक्षण घेतले आहे. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाल्यानंतर रोहितने पुन्हा पुस्तकाला हात लावला नाही.
(1 / 10)

Virat Kohli- मिस्टर अँग्री यंग मॅन म्हणजेच माजी कर्णधार विराट कोहली सुद्धा फक्त १२वी पास आहे. नवी दिल्लीतील विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये शिकत असताना त्याने अंडर-१९ क्रिकेटमध्ये नाव कमावले होते. तो अंडर १९ क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात भारताने अंडर १९ वर्ल्डकपदेखील जिंकला आहे.
(2 / 10)

MS Dhoni- भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा माही हा एकमेव कर्णधार आहे. त्याने रांचीच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, पण क्रिकेटमुळे त्याला त्याचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. २०११ साली विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने बी.कॉम. पूर्ण केले.
(3 / 10)

KL RAHUL- टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. बंगलोरमधील एनआयटीके इंग्लिश मीडियम स्कूलनंतर राहुलने श्री भगवान महावीर जैन महाविद्यालयातून बीकॉम पूर्ण केले आहे.
(4 / 10)

Hardik Pandya- आज हार्दिककडे गाडी, बंगला, अफाट संपत्ती आहे. पण त्याच्याकडे फक्त एकच गोष्ट नाही. ते म्हणजे शालेय शिक्षण. हार्दिक पांड्या नववी नापास आहे. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी त्याने आपला अभ्यास पणाला लावला होता, त्यात तो यशस्वीही झाला आहे.
(5 / 10)

Jasprit Bumrah- भारताचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह १२ वी शिकला आहे. अहमदाबादच्या निर्माण हायस्कूलमधून त्याने १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर बुमराहने शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला.
(6 / 10)

Rishabh pant- ऋषभ पंतने उत्तराखंडमधून दिल्लीत येऊन क्रिकेट कारकीर्द घडवली आहे. इंडियन पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने दिल्ली विद्यापीठाच्या श्री व्यंकटेश्वर कॉलेजमधून बीकॉम केले आहे.
(7 / 10)

sachin tendulkar- तीन दशकांहून अधिक काळ क्रिकेट गाजवणाऱ्या सचिनने केवळ बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. वयाच्या १६ व्या वर्षी टीम इंडियात संधी मिळाल्यानंतर कोणाला अभ्यासात रस असेल.
(8 / 10)

sourav ganguly- टीम इंडियाचा दादा आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचा रेकॉर्ड येथे थोडा चांगला आहे. तो सेंट झेवियर्स कॉलेजचा पदवीधर आहे.
(9 / 10)

Team India Cricketrs Educational Qualifications
(10 / 10)
Team India Cricketrs Educational Qualifications(all photos- Instagram)

    शेअर करा