मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Indian Navy:भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करण्यास नौदल सज्ज; ‘डे अॅट सी’त घडले सामर्थ्यांचे दर्शन

Indian Navy:भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करण्यास नौदल सज्ज; ‘डे अॅट सी’त घडले सामर्थ्यांचे दर्शन

Nov 08, 2023, 07:34 AMIST

Indian Navy Day at Sea: भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडने अरबी समुद्रात 'डे अॅट सी' कार्यक्रम आयोजित करत भारतीय नौदलाच्या ताकदीची झलक दाखवली. युद्धजन्यस्थीतीत भारतीय नौदल कसे काम करते याचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी आला. आयएनस बियास या जहाजातून दिवसभर युद्ध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

  • Indian Navy Day at Sea: भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडने अरबी समुद्रात 'डे अॅट सी' कार्यक्रम आयोजित करत भारतीय नौदलाच्या ताकदीची झलक दाखवली. युद्धजन्यस्थीतीत भारतीय नौदल कसे काम करते याचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी आला. आयएनस बियास या जहाजातून दिवसभर युद्ध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
 भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडने 'डे अॅट सी' च्या माध्यमातून नौदलाच्या ताकदीचे दर्शन घडवले. तब्बल ४० माध्यम प्रतिनिधींणी आयएनएस बियास मधून समुद्र सफारी सोबतच नौदलाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला. या सोबतच समुद्रात नौदलाला येणारी आव्हाने आणि त्यावर कशा पद्धतीने मात केली जाते, युद्धजन्य परिस्थितीत नौदल कसे कार्य करते याचे देखील प्रत्यक्षिक यावेळी दाखण्यात आले.
(1 / 8)

 'डे अॅट सी' या उपक्रमात जहाजांद्वारे हाय-स्पीड मॅन्युव्हर्स, नौदल हेलिकॉप्टरद्वारे शोध आणि बचाव प्रात्यक्षिके आदि बाबी दाखवण्यात आल्या. 
(2 / 8)

 शत्रूने जर हल्ला केला तर त्याला कसे प्रत्युत्तर दिले जाते, क्षेपणास्त्र कशी डागली जातात, युद्धाची तयारी काशी केली जाते, इंधन कसे भरले जाते. तसेच जहाजावर आण्विक, रासायनिक हल्ला झाल्यास त्याला कशा पद्धतीने तोंड दिले जाते याचा देखील प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
(3 / 8)

 यावेळी मारकोज कमांडो यांनी समुद्रात फसलेल्या नागरिकांना कसे वाचवले जाते, समुद्री चाचे यांच्या विरोधात कशा पद्धतीने मोहीम आणि कारवाई केली जाते याचे देखील प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.  
(4 / 8)

यावेळी फास्ट अटॅक क्राफ्टद्वारे आभासी हल्ला,  कलवरी वर्गाच्या पाणबुडीचे प्रात्यक्षिक, किलर स्क्वाड्रन जहाजाचे क्षेपणास्त्र प्रात्यक्षिक, सीकिंग हेलिकॉप्टरचे सोनार डंक ऑपरेशन आणि डॉरनीयर विमानांद्वारे समुद्र सीमेवर कशा पद्धतीने लक्ष ठेवले जाते याचे देखील प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. 
(5 / 8)

सी किंग या हेलिकॉप्टरच्या मदतीने सोनार पाण्यात सोडून खोलवर पाण्यात लपून बसलेल्या शत्रू पाणबुड्यांच्या शोध घेऊन त्यांना नष्ट करण्याचे देखील प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.   
(6 / 8)

जहाजांमधील दोरीचा वापर करून वस्तू आणि मनुष्यबळाची देवाणघेवाण दाखवण्यासाठी आयएनएस बियास आणि आयएनएस बेटवा या जहाजांचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले.  
(7 / 8)

यावेळी नौदलाच्या जहाजाची रचना आणि कार्य कसे चालते हे देखील दाखवण्यात आले. जहाजात विविध विभाग असतात, मशीनरी कंपार्टमेंट, डायनिंग हॉल, क्षेपणास्त्र विभाग, कंट्रोल रूम जेथून संपूर्ण जहाजाचे संचलन केले जाते. या सोबतच जहाजाला ऊर्जा आणि विद्युत पुरवठा करणारि बॉयलर रूम देखील दाखवन्यात आली. या ठिकाणी नाविक तब्बल ४४ टे ५० डिग्री तापमानात सलग ८ तास काम करत असतात. 
(8 / 8)

    शेअर करा