मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dahi Handi : थरारक… तुडुंब भरलेल्या विहिरीच्या मधोमध लटकलेली हंडी फोडण्यासाठी झेपावतात तरुण

Dahi Handi : थरारक… तुडुंब भरलेल्या विहिरीच्या मधोमध लटकलेली हंडी फोडण्यासाठी झेपावतात तरुण

Sep 08, 2023, 01:33 PMIST

Thrilling Dahi Handi Celebration: अलिबाग तालुक्यातील कुर्डुस गावात आगळ्यावेगळ्या पद्धतीने दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो. येथे विहिरीवर लटकवलेली हंडी तरुण उंच उडी मारून हंडीकडे झेपावून फोडतात. 

Thrilling Dahi Handi Celebration: अलिबाग तालुक्यातील कुर्डुस गावात आगळ्यावेगळ्या पद्धतीने दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो. येथे विहिरीवर लटकवलेली हंडी तरुण उंच उडी मारून हंडीकडे झेपावून फोडतात. 
दहीहंडीच्या दिवशी गोविंदा एकावर एक थर करून उभे राहून हंडी फोडत असल्याचं आपण नेहमी पाहतो. परंतु, मुंबईजवळ अलिबाग तालुक्यात एका गावात मात्र थोड्या हटके स्टाइलने दहीहंडी फोडण्यात येते. येथे एका विहिरीवर उंच कमान करून हंडी बांधली जाते. ही हंडी फोडण्यासाठी गावातील तरुण विहिरीच्या कठड्यावर उभे राहून १० ते १५ फूट उंच उडी घेऊन हंडीच्या दिशेने झेपावतात.
(1 / 4)
दहीहंडीच्या दिवशी गोविंदा एकावर एक थर करून उभे राहून हंडी फोडत असल्याचं आपण नेहमी पाहतो. परंतु, मुंबईजवळ अलिबाग तालुक्यात एका गावात मात्र थोड्या हटके स्टाइलने दहीहंडी फोडण्यात येते. येथे एका विहिरीवर उंच कमान करून हंडी बांधली जाते. ही हंडी फोडण्यासाठी गावातील तरुण विहिरीच्या कठड्यावर उभे राहून १० ते १५ फूट उंच उडी घेऊन हंडीच्या दिशेने झेपावतात.(PTI)
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डुस या गावात सुमारे ३० वर्षांपासून विहिरीवर झेप घेऊन दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू आहे. ही अनोखी आणि थरारक अशी दहीहंडी पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील नागरिक कुर्डुस या ठिकाणी येत असतात.
(2 / 4)
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डुस या गावात सुमारे ३० वर्षांपासून विहिरीवर झेप घेऊन दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू आहे. ही अनोखी आणि थरारक अशी दहीहंडी पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील नागरिक कुर्डुस या ठिकाणी येत असतात.(PTI)
कुर्डुसमधील देऊळआळीत डबकी आणि माळीण या २ विहिरींवर दहीहंडी बांधली जाते. सुमारे ३० वर्षांपासून विहिरीवर झेप घेऊन दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू आहे. ही अनोखी आणि थरारक अशी दहीहंडी पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील नागरिक कुर्डुस या ठिकाणी येत असतात.
(3 / 4)
कुर्डुसमधील देऊळआळीत डबकी आणि माळीण या २ विहिरींवर दहीहंडी बांधली जाते. सुमारे ३० वर्षांपासून विहिरीवर झेप घेऊन दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू आहे. ही अनोखी आणि थरारक अशी दहीहंडी पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील नागरिक कुर्डुस या ठिकाणी येत असतात.(PTI)
दहीहंडी फोडल्यानंतर जमलेली गावातली तरुण मंडळी एकच जल्लोष करतात. ४० फूट खोल असलेल्या या विहिरीत उड्या मारून तरुण पोहण्याचा आनंद घेतात. उडी मारून दहीहंडी फोडण्याचा हा प्रकार सगळीकडे आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे.
(4 / 4)
दहीहंडी फोडल्यानंतर जमलेली गावातली तरुण मंडळी एकच जल्लोष करतात. ४० फूट खोल असलेल्या या विहिरीत उड्या मारून तरुण पोहण्याचा आनंद घेतात. उडी मारून दहीहंडी फोडण्याचा हा प्रकार सगळीकडे आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे.(PTI)

    शेअर करा