मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  COVID-19 चा धोका पुन्हा वाढतोय; तुमच्या मोबाइलमध्ये 'हे' ५ ॲप डाउनलोड करा आणि रहा सुरक्षित

COVID-19 चा धोका पुन्हा वाढतोय; तुमच्या मोबाइलमध्ये 'हे' ५ ॲप डाउनलोड करा आणि रहा सुरक्षित

Dec 25, 2023, 07:57 PMIST

कोविडचा JN.1 हा उपप्रकार समोर आल्यापासून COVID-19 च्या केसेस वाढत आहेत. तुमच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू, ईसंजीवनी सारखे ५ ॲप डाउनलोड करा आणि सुरक्षिततेविषयी संपूर्ण काळजी घ्या. 

कोविडचा JN.1 हा उपप्रकार समोर आल्यापासून COVID-19 च्या केसेस वाढत आहेत. तुमच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू, ईसंजीवनी सारखे ५ ॲप डाउनलोड करा आणि सुरक्षिततेविषयी संपूर्ण काळजी घ्या. 
भारतात कोविड-19 च्या केसेस पुन्हा वाढू लागल्या आहेत. देशात काही राज्यात JN.1 हा सब व्हेरिएंट आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या नव्या सब व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून संख्येत वाढ होत आहे. अशा वेळी या नवीन सब व्हेरिएंटविषयी खात्रीशीर माहिती मिळवून त्यापासून बचाव करण्यासाठी काही ॲप तुमच्या मोबाइलमध्ये असणे आवश्यक आहे. अशाच ५ अॅप्सवर एक नजर टाकू या.
(1 / 6)
भारतात कोविड-19 च्या केसेस पुन्हा वाढू लागल्या आहेत. देशात काही राज्यात JN.1 हा सब व्हेरिएंट आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या नव्या सब व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून संख्येत वाढ होत आहे. अशा वेळी या नवीन सब व्हेरिएंटविषयी खात्रीशीर माहिती मिळवून त्यापासून बचाव करण्यासाठी काही ॲप तुमच्या मोबाइलमध्ये असणे आवश्यक आहे. अशाच ५ अॅप्सवर एक नजर टाकू या.(COVID-19)
आरोग्य सेतू - आरोग्य सेतू अॅपमध्ये तुम्हाला Covid-19 बद्दल तपशीलवार आणि अपडेटेड माहिती मिळते. यात तुमच्या लसीकरणाबाबत संपूर्ण तपशील ठेवलेला असतो. शिवाय डॉक्टरांचा सल्ला यात दिलेला असतो. आरोग्य खात्याच्या 'आयुष्यमान भारत' योजनेसाठी तुम्ही या अॅपद्वारे नोंदणी करू शकता. याशिवायही बरीच महत्वाची माहितीया अॅपद्वारे तुम्ही मिळवू शकता. हे अॅप हे एक पूर्ण पोर्टल आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही इतर सरकारी सेवांच्या वेबसाइटवर जाऊ शकता.
(2 / 6)
आरोग्य सेतू - आरोग्य सेतू अॅपमध्ये तुम्हाला Covid-19 बद्दल तपशीलवार आणि अपडेटेड माहिती मिळते. यात तुमच्या लसीकरणाबाबत संपूर्ण तपशील ठेवलेला असतो. शिवाय डॉक्टरांचा सल्ला यात दिलेला असतो. आरोग्य खात्याच्या 'आयुष्यमान भारत' योजनेसाठी तुम्ही या अॅपद्वारे नोंदणी करू शकता. याशिवायही बरीच महत्वाची माहितीया अॅपद्वारे तुम्ही मिळवू शकता. हे अॅप हे एक पूर्ण पोर्टल आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही इतर सरकारी सेवांच्या वेबसाइटवर जाऊ शकता.(REUTERS)
ई संजिवनी (eSanjeevani) - फक्त आरोग्यसेवा क्षेत्रात कार्यरत कर्मचारी वर्गासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे. देशभरातील आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर्समधील डॉक्टरांशी टेलिफोनच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी सुविधा या अॅपमध्ये असून याचे इंटरफेस बहुभाषिक आहे. डॉक्टर, जनरल फिजिशियन तसेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांना या सुविधेमुळे चांगली सोय झाली असून ग्रामीण भाग आणि वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या समाजबांधवांसाठी या अॅपद्वारे आरोग्य मदत मिळवणे सोपे झाले आहे.
(3 / 6)
ई संजिवनी (eSanjeevani) - फक्त आरोग्यसेवा क्षेत्रात कार्यरत कर्मचारी वर्गासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे. देशभरातील आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर्समधील डॉक्टरांशी टेलिफोनच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी सुविधा या अॅपमध्ये असून याचे इंटरफेस बहुभाषिक आहे. डॉक्टर, जनरल फिजिशियन तसेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांना या सुविधेमुळे चांगली सोय झाली असून ग्रामीण भाग आणि वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या समाजबांधवांसाठी या अॅपद्वारे आरोग्य मदत मिळवणे सोपे झाले आहे.(eSanjeevani)
डिजीयात्रा - जर तुम्ही विमानाद्वारे प्रवास करत असाल तर डिजीयात्रा अॅप तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या सर्व दस्तऐवज आणि इतर गरजांची पूर्तता करते. या अॅपद्वारे तुम्ही तुमचा विमानातील बोर्डिंग पास आणि तिकिटे स्कॅन करू शकता, तसेच तुमची ओळखीसंबंधित कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी या अॅपच्या माध्यमातून डिजिलॉकरमध्ये जाऊ शकता. हे अॅप प्रवासादरम्यान तुमच्यावर परिणाम करू शकणारी नवीनतम COVID-19-संबंधित माहिती देते. शिवाय तुम्‍ही स्‍वत: सुरक्षित राहण्यासाठी विविध मार्गदर्शक तत्त्वे देखील शेअर करते.
(4 / 6)
डिजीयात्रा - जर तुम्ही विमानाद्वारे प्रवास करत असाल तर डिजीयात्रा अॅप तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या सर्व दस्तऐवज आणि इतर गरजांची पूर्तता करते. या अॅपद्वारे तुम्ही तुमचा विमानातील बोर्डिंग पास आणि तिकिटे स्कॅन करू शकता, तसेच तुमची ओळखीसंबंधित कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी या अॅपच्या माध्यमातून डिजिलॉकरमध्ये जाऊ शकता. हे अॅप प्रवासादरम्यान तुमच्यावर परिणाम करू शकणारी नवीनतम COVID-19-संबंधित माहिती देते. शिवाय तुम्‍ही स्‍वत: सुरक्षित राहण्यासाठी विविध मार्गदर्शक तत्त्वे देखील शेअर करते.(DigiYatra)
MyGov - MyGov अॅप हे प्रामुख्याने सरकारी उपक्रमांची माहिती मिळवणे, त्यात सहभागी होण्याच्या कामासाठी वापरला जातो. परंतु हे अॅप COVID-19 च्या संदर्भात देखील फार उपयुक्त आहे. या अॅपच्या डॅशबोर्डवर कोरोना व्हायरससंबंधी तपशीलवार माहिती असून देशात कोविडच्या सध्याच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती येथे मिळते. यात कोविडचे नवीन रुग्ण, वाढ, तसेच जिल्हा-स्तरीय आकडेवारी या डॅशबोर्डवर दर्शविली जाते.
(5 / 6)
MyGov - MyGov अॅप हे प्रामुख्याने सरकारी उपक्रमांची माहिती मिळवणे, त्यात सहभागी होण्याच्या कामासाठी वापरला जातो. परंतु हे अॅप COVID-19 च्या संदर्भात देखील फार उपयुक्त आहे. या अॅपच्या डॅशबोर्डवर कोरोना व्हायरससंबंधी तपशीलवार माहिती असून देशात कोविडच्या सध्याच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती येथे मिळते. यात कोविडचे नवीन रुग्ण, वाढ, तसेच जिल्हा-स्तरीय आकडेवारी या डॅशबोर्डवर दर्शविली जाते.(MyGov)
उमंग - हे एक महत्त्वाचे सरकारी सेवांसंबंधीची माहिती आणि सेवा पुरवणारे अॅप आहे. हे अॅप यूजर्सना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच महानगरपालिकांच्या विविध सेवांची माहिती देते. हे अॅप EPF, NPS आणि MyPAN, डिजीलॉकर, पेन्शनर्स पोर्टल, डिजी सेवक यांसारख्या लोकप्रिय ग्राहक-केंद्रीत सेवा प्लॅटफॉर्मला जोडलेले आहे. या अॅपद्वारे घरबसल्या अर्ज करू शकता. तसेच प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. कोविड-19 च्या रुग्णांची संख्या वाढत असातना सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन गर्दी टाळण्यासाठी हे अॅप उपयोगी पडू शकते.
(6 / 6)
उमंग - हे एक महत्त्वाचे सरकारी सेवांसंबंधीची माहिती आणि सेवा पुरवणारे अॅप आहे. हे अॅप यूजर्सना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच महानगरपालिकांच्या विविध सेवांची माहिती देते. हे अॅप EPF, NPS आणि MyPAN, डिजीलॉकर, पेन्शनर्स पोर्टल, डिजी सेवक यांसारख्या लोकप्रिय ग्राहक-केंद्रीत सेवा प्लॅटफॉर्मला जोडलेले आहे. या अॅपद्वारे घरबसल्या अर्ज करू शकता. तसेच प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. कोविड-19 च्या रुग्णांची संख्या वाढत असातना सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन गर्दी टाळण्यासाठी हे अॅप उपयोगी पडू शकते.(SOCIALEPFO YouTube)

    शेअर करा