मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Congress Protest: महागाईवरून काँग्रेस आक्रमक, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

Congress Protest: महागाईवरून काँग्रेस आक्रमक, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

Aug 05, 2022, 01:12 PMIST

दिल्लीत आंदोलनावेळी प्रियांका गांधी यांनी बॅरिकेड्स ओलांडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींसह प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • दिल्लीत आंदोलनावेळी प्रियांका गांधी यांनी बॅरिकेड्स ओलांडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींसह प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक झाले असून संसद ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र हा मोर्चा रोखण्यात आला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
(1 / 8)
महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक झाले असून संसद ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र हा मोर्चा रोखण्यात आला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.(फोटो - पीटीआय)
संसदेत काँग्रेस खासदारांनी महागाई आणि बेरोजगारी विरोधात काळे कपडे घालून आंदोलन केले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हेसुद्धा काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले होते. 
(2 / 8)
संसदेत काँग्रेस खासदारांनी महागाई आणि बेरोजगारी विरोधात काळे कपडे घालून आंदोलन केले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हेसुद्धा काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले होते. (PTI)
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही खासदारांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी हातात पोस्टर्स घेतले होते. तसंच मोदी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
(3 / 8)
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही खासदारांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी हातात पोस्टर्स घेतले होते. तसंच मोदी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.(फोटो - पीटीआय)
काँग्रेसचे सर्व खासदार महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दिशेने मोर्चा काढत होते, मात्र त्यांना रोखण्यात आलं. आमचं काम आहे समस्यांबद्दल प्रश्न विचारणं. काही आमदारांना ताब्यात घेतलंय तर काहींना मारहाण करण्यात आल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं.
(4 / 8)
काँग्रेसचे सर्व खासदार महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दिशेने मोर्चा काढत होते, मात्र त्यांना रोखण्यात आलं. आमचं काम आहे समस्यांबद्दल प्रश्न विचारणं. काही आमदारांना ताब्यात घेतलंय तर काहींना मारहाण करण्यात आल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं.(PTI)
दिल्लीत आंदोलनावेळी प्रियांका गांधी यांनी बॅरिकेड्स ओलांडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. प्रियांका गांधी यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.
(5 / 8)
दिल्लीत आंदोलनावेळी प्रियांका गांधी यांनी बॅरिकेड्स ओलांडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. प्रियांका गांधी यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.(फोटो - एएनआय)
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी म्हटले की, महागाई प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. सरकारला काही करावं लागेल. आम्ही यासाठीच आंदोलन करत आहे.
(6 / 8)
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी म्हटले की, महागाई प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. सरकारला काही करावं लागेल. आम्ही यासाठीच आंदोलन करत आहे.(फोटो - पीटीआय)
महागाईवरून केंद्र सरकारला प्रश्न विचारताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले म्हणाले की, "अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हेच कळेना. स्टार्टअप इंडिया आहे असं ते म्हणतात पण सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया. लोकांना नोकरीवरुन काढलं जातंय."
(7 / 8)
महागाईवरून केंद्र सरकारला प्रश्न विचारताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले म्हणाले की, "अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हेच कळेना. स्टार्टअप इंडिया आहे असं ते म्हणतात पण सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया. लोकांना नोकरीवरुन काढलं जातंय."(PTI)
आसामच्या गुवाहाटीतही काँग्रेस नेत्यांनी महागाईविरोधात आंदोलन केलं. वाढत्या किंमती आणि अनेक वस्तुंवर लागू करण्यात आलेल्या जीएसटी वरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी हातात पोस्टर घेत केंद्राचा निषेध केला.
(8 / 8)
आसामच्या गुवाहाटीतही काँग्रेस नेत्यांनी महागाईविरोधात आंदोलन केलं. वाढत्या किंमती आणि अनेक वस्तुंवर लागू करण्यात आलेल्या जीएसटी वरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी हातात पोस्टर घेत केंद्राचा निषेध केला.(फोटो - पीटीआय)

    शेअर करा