मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kane Williamson : केन विल्यमसन हॉस्पिटलमध्ये नर्सच्या प्रेमात पडला, ९ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतो

Kane Williamson : केन विल्यमसन हॉस्पिटलमध्ये नर्सच्या प्रेमात पडला, ९ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतो

Aug 08, 2023, 05:47 PMIST

kane williamson birthday : केन विल्यमसन फॅब-4 श्रेणीत असून त्यात विराट कोहली, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांचाही समावेश आहे. क्रिकेटशिवाय केन विल्यमसन त्याच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती खूप पर्सनल ठेवतो. पण विल्यमसनची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे.

  • kane williamson birthday : केन विल्यमसन फॅब-4 श्रेणीत असून त्यात विराट कोहली, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांचाही समावेश आहे. क्रिकेटशिवाय केन विल्यमसन त्याच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती खूप पर्सनल ठेवतो. पण विल्यमसनची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आज (८ ऑगस्ट) आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. विल्यमसन हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. टी-20 क्रिकेटच्या युगात बहुतेक फलंदाज नवनवीन फटके शोधून काढतात. याउलट विल्यमसनने आपल्या कॉपी बुक स्टाइल फलंदाजीच्या शैलीत कोणताही बदल केला नाही. त्याचा आपल्या टेक्निकवर नेहमीच विश्वास असतो. 
(1 / 10)

२०१५ मध्ये केन विल्यमसन उपचारासाठी रुग्णालयात पोहोचला होता. येथेच त्याची नर्स सारा रहीमशी भेट झाली आणि तो साराच्या प्रेमात पडला. तेव्हा हे प्रेम एकतर्फी होते. हळूहळू साराही केन विल्यमसनला पसंत करू लागली आणि नंतर दोघेही नात्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विल्यमसन आणि साराने अद्याप लग्न केलेले नाही. असे असूनही दोघेही पती-पत्नीसारखे राहतात.
(2 / 10)

जवळपास ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर १६ डिसेंबर २०२० रोजी साराने एका मुलीला जन्म दिला. विल्यमसनने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. यानंतर मे २०२२ मध्येही केन आणि सारा पुन्हा एकदा पालक झाले. यावेळी ते एका मुलाचे पालक झाले.
(3 / 10)

केन विल्यमसनची गर्लफ्रेंड सारा रहीमचे नाव अनेकवेळा पाकिस्तानशी जोडले गेले आहे. सारा ही पाकिस्तानी असल्याचा लोकांचा अंदाज होता. पण तसे नाही, सारा मूळची इंग्लंडची आहे. तिचा जन्म ब्रिस्टल येथे झाला.
(4 / 10)

केन विल्यमसनने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले असले तरी वनडे आणि टी-20 मध्ये तो न्यूझीलंड संघाचा कर्णधार आहे. 
(5 / 10)

आयपीएलमधील सहकारी खेळाडू विल्यमसनला 'केन मामा' म्हणून हाक मारतात. विल्यमसन जेव्हा दुसऱ्यांदा पिता बनला तेव्हा अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने या नावानेच त्याचे अभिनंदन केले होते.
(6 / 10)

केन विल्यमसनने आतापर्यंत न्यूझीलंडकडून ९४ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ८७ टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ५४.८९ च्या सरासरीने ८१२४ धावा केल्या आहेत ज्यात २८ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे.
(7 / 10)

 एकदिवसीय क्रिकेटमध्ये विल्यमसनच्या ४७.८३ च्या सरासरीने ६५५४ धावा आहेत. केन विल्यमसनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३ शतके आणि ४२ अर्धशतके केली आहेत.
(8 / 10)

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये विल्यमसनने १७ अर्धशतकांच्या मदतीने २४६४ धावा केल्या आहेत. विल्यमसन हा न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तर न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो रॉस टेलरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
(9 / 10)

kane williamson birthday
(10 / 10)
kane williamson birthday(photos - kane williamson instagram)

    शेअर करा