मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  World Cup 2023 : वॉर्नर ते डीकॉक! वर्ल्डकपनंतर हे ५ खेळाडू वनडे क्रिकेट खेळणार नाहीत

World Cup 2023 : वॉर्नर ते डीकॉक! वर्ल्डकपनंतर हे ५ खेळाडू वनडे क्रिकेट खेळणार नाहीत

Nov 11, 2023, 07:59 PMIST

ODI World Cup 2023 : भारतात सुरू असलेला क्रिकेट वर्ल्डकप शेवटच्या टप्प्यात आला आहे. आता बाद फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. हा विश्वचषक अनेक दिग्गजांसाठी शेवटचा आहे. या वर्ल्डकपनंतर अनेक दिग्गज एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार नाहीत. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.

  • ODI World Cup 2023 : भारतात सुरू असलेला क्रिकेट वर्ल्डकप शेवटच्या टप्प्यात आला आहे. आता बाद फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. हा विश्वचषक अनेक दिग्गजांसाठी शेवटचा आहे. या वर्ल्डकपनंतर अनेक दिग्गज एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार नाहीत. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.
वर्ल्डकप २०२३ चे ४ सेमी फायनलीस्टदेखील ठरले आहेत. वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठी यजमान भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पात्र ठरले आहेत. क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड वॉर्नर वर्ल्डकप विजयाने आपल्या करिअरचा शेवट करण्यास प्रयत्नशील असतील.
(1 / 6)
वर्ल्डकप २०२३ चे ४ सेमी फायनलीस्टदेखील ठरले आहेत. वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठी यजमान भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पात्र ठरले आहेत. क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड वॉर्नर वर्ल्डकप विजयाने आपल्या करिअरचा शेवट करण्यास प्रयत्नशील असतील.
नवीन उल हक- अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो, नवीन उल हकसाठी हा विश्वचषक शेवटचा ठरू शकतो. या वर्ल्डकपआधीच त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. नवीन उल हक वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार नाही.
(2 / 6)
नवीन उल हक- अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो, नवीन उल हकसाठी हा विश्वचषक शेवटचा ठरू शकतो. या वर्ल्डकपआधीच त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. नवीन उल हक वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार नाही.(PTI)
डेव्हिड वॉर्नर- ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे, संघाचा अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरने या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत तीन शतके ठोकली आहेत. त्याचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. या वर्ल्डकपनंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
(3 / 6)
डेव्हिड वॉर्नर- ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे, संघाचा अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरने या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत तीन शतके ठोकली आहेत. त्याचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. या वर्ल्डकपनंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.(PTI)
क्विंटन डीकॉक- दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक शेवटचा विश्वचषक खेळत आहे. या विश्वचषकापूर्वीच त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर क्विंटन डी कॉक वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र, या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्विंटन डी कॉक पहिल्या क्रमांकावर आहे. क्विंटन डी कॉकने या विश्वचषकात आतापर्यंत ४ शतके ठोकली आहेत.
(4 / 6)
क्विंटन डीकॉक- दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक शेवटचा विश्वचषक खेळत आहे. या विश्वचषकापूर्वीच त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर क्विंटन डी कॉक वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र, या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्विंटन डी कॉक पहिल्या क्रमांकावर आहे. क्विंटन डी कॉकने या विश्वचषकात आतापर्यंत ४ शतके ठोकली आहेत.(PTI)
मोईन अली - इंग्लंडसाठी हा वर्ल्डकप अतिशय निराशाजनक राहिला आहे. स्टार ऑलराऊंडर मोईन अलीही या वर्ल्डकपमध्ये काही विशेष करू शकला नाही. या स्पर्धेनंतर मोईन अली वनडे फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतो. म्हणजेच या विश्वचषकात मोईन अली शेवटच्या वेळी इंग्लंडच्या वनडे जर्सीत दिसणार आहे.
(5 / 6)
मोईन अली - इंग्लंडसाठी हा वर्ल्डकप अतिशय निराशाजनक राहिला आहे. स्टार ऑलराऊंडर मोईन अलीही या वर्ल्डकपमध्ये काही विशेष करू शकला नाही. या स्पर्धेनंतर मोईन अली वनडे फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतो. म्हणजेच या विश्वचषकात मोईन अली शेवटच्या वेळी इंग्लंडच्या वनडे जर्सीत दिसणार आहे.(Reuters)
बेन स्टोक्स- गतविजेत्या इंग्लंडसाठी हा विश्वचषक निराशाजनक ठरला आहे. मात्र, या विश्वचषकात अष्टपैलू बेन स्टोक्सने चमकदार कामगिरी केली. वास्तविक, बेन स्टोक्सने एकदिवसीय फॉर्मेटला अलविदा केला होता, परंतु विश्वचषक खेळण्यासाठी त्याने निवृत्ती मागे घेतली. या विश्वचषकानंतर बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही.
(6 / 6)
बेन स्टोक्स- गतविजेत्या इंग्लंडसाठी हा विश्वचषक निराशाजनक ठरला आहे. मात्र, या विश्वचषकात अष्टपैलू बेन स्टोक्सने चमकदार कामगिरी केली. वास्तविक, बेन स्टोक्सने एकदिवसीय फॉर्मेटला अलविदा केला होता, परंतु विश्वचषक खेळण्यासाठी त्याने निवृत्ती मागे घेतली. या विश्वचषकानंतर बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही.(AFP)

    शेअर करा