मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधी जिंकणार? ICC इव्हेंटच्या फायनलमध्ये भारताचा सलग तिसऱ्यांदा धुव्वा

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधी जिंकणार? ICC इव्हेंटच्या फायनलमध्ये भारताचा सलग तिसऱ्यांदा धुव्वा

Feb 11, 2024, 10:07 PMIST

U19 World Cup Final, Ind vs Aus : टीम इंडियाने वर्षभरात आयसीसी स्पर्धांच्या तीन फायनल खेळल्या. विशेष म्हणजे या तिन्ही फायनल भारताने एकाच संघाविरुद्ध खेळल्या आणि निकालदेखील प्रत्येकवेळी सारखाच लागला. या तिन्ही फायलनध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला.

  • U19 World Cup Final, Ind vs Aus : टीम इंडियाने वर्षभरात आयसीसी स्पर्धांच्या तीन फायनल खेळल्या. विशेष म्हणजे या तिन्ही फायनल भारताने एकाच संघाविरुद्ध खेळल्या आणि निकालदेखील प्रत्येकवेळी सारखाच लागला. या तिन्ही फायलनध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला.
अंडर १९ वर्ल्डकप २०२४ ची फायनल आज भारत आणि  ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली. दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनी येथील विलोमूर पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ७९ धावांनी धुळ चारली.
(1 / 8)
अंडर १९ वर्ल्डकप २०२४ ची फायनल आज भारत आणि  ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली. दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनी येथील विलोमूर पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ७९ धावांनी धुळ चारली.(AFP)
अंडर १९ वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतासमोर २५४ धावांचे लक्ष्य होते. पण संपूर्ण संघ ४३.५ षटकात १७४ धावांवर गारद झाला. यासह ऑस्ट्रेलियन संघ चौथ्यांदा अंडर-१९ वर्ल्ड चॅम्पियन बनला. त्याचवेळी भारताचे सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
(2 / 8)
अंडर १९ वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतासमोर २५४ धावांचे लक्ष्य होते. पण संपूर्ण संघ ४३.५ षटकात १७४ धावांवर गारद झाला. यासह ऑस्ट्रेलियन संघ चौथ्यांदा अंडर-१९ वर्ल्ड चॅम्पियन बनला. त्याचवेळी भारताचे सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.(AP)
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने वर्षभरात तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये हरवले. यापूर्वीच्या दोन फायनलमध्ये (WTC आणि वनडे वर्ल्डकप) भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता आजही भारताचा पराभव झाला.
(3 / 8)
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने वर्षभरात तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये हरवले. यापूर्वीच्या दोन फायनलमध्ये (WTC आणि वनडे वर्ल्डकप) भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता आजही भारताचा पराभव झाला.(AFP)
पण वनडे वर्ल्डकपच्या फायनलनंतर ८४ दिवसांनी भारताला आज बदला घेण्याची संधी होती. पण ती संधी टीम इंडियाने गमावली.
(4 / 8)
पण वनडे वर्ल्डकपच्या फायनलनंतर ८४ दिवसांनी भारताला आज बदला घेण्याची संधी होती. पण ती संधी टीम इंडियाने गमावली.(AFP)
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्यांदा अंडर १९ वर्ल्डकपची फायनल झाली. याआधीच्या दोन फायनल भारताने जिंकल्या होत्या. पण आज भारताला हॅट्ट्रिक करता आली नाही.
(5 / 8)
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्यांदा अंडर १९ वर्ल्डकपची फायनल झाली. याआधीच्या दोन फायनल भारताने जिंकल्या होत्या. पण आज भारताला हॅट्ट्रिक करता आली नाही.(AFP)
ऑस्ट्रेलियन संघ १९८८, २००२, २०१० आणि २०२४ चा अंडर-१९ वर्ल्ड चॅम्पियन आहे. तर भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये अंडर १९ वर्ल्डकप जिंकला होता. तसेच, २००६, २०१६, २०२० आणि आता २०२४ मध्ये टीम इंडिया उपविजेता ठरली.
(6 / 8)
ऑस्ट्रेलियन संघ १९८८, २००२, २०१० आणि २०२४ चा अंडर-१९ वर्ल्ड चॅम्पियन आहे. तर भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये अंडर १९ वर्ल्डकप जिंकला होता. तसेच, २००६, २०१६, २०२० आणि आता २०२४ मध्ये टीम इंडिया उपविजेता ठरली.(AP)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१२ मध्ये पहिल्यांदा अंडर १९ वर्ल्डकपची फायनल झाली होती. त्या सामन्यात भारताने कांगारुंचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. २०१२ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियनाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४ गडी गमावून २२७ धावा करत विजय मिळवला.
(7 / 8)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१२ मध्ये पहिल्यांदा अंडर १९ वर्ल्डकपची फायनल झाली होती. त्या सामन्यात भारताने कांगारुंचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. २०१२ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियनाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४ गडी गमावून २२७ धावा करत विजय मिळवला.(AFP)
त्यानंतर २०१८ मध्येही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर १९ वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यातही भारताने ८ विकेट्सनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करताना २१६ धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारताने २ बाद २२० धावा करून विजय मिळवला. 
(8 / 8)
त्यानंतर २०१८ मध्येही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर १९ वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यातही भारताने ८ विकेट्सनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करताना २१६ धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारताने २ बाद २२० धावा करून विजय मिळवला. (AP)

    शेअर करा