मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Covid New Variant: कोविडचा नवीन विषाणू JN. 1 कितपत धोकादायक आहे?

Covid New Variant: कोविडचा नवीन विषाणू JN. 1 कितपत धोकादायक आहे?

Dec 19, 2023, 06:48 PMIST

कोव्हिड-१९ च्या नव्या व्हेरिएंटने जगाची चिंता पुन्हा एकदा वाढवली आहे. भारतात केरळमध्ये जेएन.१ हा सबव्हेरिअंट वेगाने पसरतोय. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना आरोग्यविषयक उपाययोजना वाढविण्याचा सल्ला दिला.

  • कोव्हिड-१९ च्या नव्या व्हेरिएंटने जगाची चिंता पुन्हा एकदा वाढवली आहे. भारतात केरळमध्ये जेएन.१ हा सबव्हेरिअंट वेगाने पसरतोय. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना आरोग्यविषयक उपाययोजना वाढविण्याचा सल्ला दिला.
JN.1 हा कोरोना व्हायरसचा सबव्हेरियंट असून BA.2.86 प्रकारातून त्याची उत्पत्ती झाली आहे. याला पिरोला असेही म्हणतात. हा विषाणूचा प्रकार सप्टेंबर महिन्यात प्रथमच अमेरिकेत आढळून आला. भारतात सर्वप्रथम JN.1 ची केस ही ८ डिसेंबर रोजी केरळमध्ये आढळून आली.
(1 / 7)
JN.1 हा कोरोना व्हायरसचा सबव्हेरियंट असून BA.2.86 प्रकारातून त्याची उत्पत्ती झाली आहे. याला पिरोला असेही म्हणतात. हा विषाणूचा प्रकार सप्टेंबर महिन्यात प्रथमच अमेरिकेत आढळून आला. भारतात सर्वप्रथम JN.1 ची केस ही ८ डिसेंबर रोजी केरळमध्ये आढळून आली.(PTI)
JN.1 हा कोविडचा सबव्हेरिएंट वेगाने पसरतो तसेच प्रतिकारशक्ती भेदून व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो अशी माहिती नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनचे कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी दिली आहे. 
(2 / 7)
JN.1 हा कोविडचा सबव्हेरिएंट वेगाने पसरतो तसेच प्रतिकारशक्ती भेदून व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो अशी माहिती नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनचे कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी दिली आहे. (HT File Photo)
कोव्हिडचा JN.1 हा नवीन व्हेरिएंट पूर्वीच्या XBB या व्हेरिएंटपेक्षा वेगळा असून माणसाची रोगप्रतिकारक शक्ती भेदणारा आहे. यामुळे पूर्वी कोविड संसर्ग झालेल्या लोकांना तसेच लसीकरण झालेल्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
(3 / 7)
कोव्हिडचा JN.1 हा नवीन व्हेरिएंट पूर्वीच्या XBB या व्हेरिएंटपेक्षा वेगळा असून माणसाची रोगप्रतिकारक शक्ती भेदणारा आहे. यामुळे पूर्वी कोविड संसर्ग झालेल्या लोकांना तसेच लसीकरण झालेल्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.(AFP)
JN.1 या सबव्हेरिएंटची लागण झाल्यास व्यक्तिच्या शरीरात अधिक गंभीर लक्षणे निर्माण होतात किंवा सध्या प्रचलित व्हेरिएंटपेक्षा हा सब व्हेरिएंट अधिक वेगाने पसरतो, याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही.
(4 / 7)
JN.1 या सबव्हेरिएंटची लागण झाल्यास व्यक्तिच्या शरीरात अधिक गंभीर लक्षणे निर्माण होतात किंवा सध्या प्रचलित व्हेरिएंटपेक्षा हा सब व्हेरिएंट अधिक वेगाने पसरतो, याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही.(PTI)
या नव्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि वारंवार हात धुणे हा सोपा उपाय असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.
(5 / 7)
या नव्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि वारंवार हात धुणे हा सोपा उपाय असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.(PTI)
केरळनंतर शेजारच्या कर्नाटक राज्यात काही जिल्ह्यात JN.1 हा सबव्हेरिएंट पसरत असल्याचं वृत्त आहे. परंतु आणखी २-३ दिवसांत त्याची तीव्रता कमी होईल. फार मोठ्या प्रमाणावर कोव्हिडची लक्षणे दिसून आली तरच राज्य सरकारतर्फे प्रतिबंधात्मक उपाय जाहीर करण्यात येतील. सध्या कोणालाही काळजी करण्याची गरज नसल्याचे कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले.
(6 / 7)
केरळनंतर शेजारच्या कर्नाटक राज्यात काही जिल्ह्यात JN.1 हा सबव्हेरिएंट पसरत असल्याचं वृत्त आहे. परंतु आणखी २-३ दिवसांत त्याची तीव्रता कमी होईल. फार मोठ्या प्रमाणावर कोव्हिडची लक्षणे दिसून आली तरच राज्य सरकारतर्फे प्रतिबंधात्मक उपाय जाहीर करण्यात येतील. सध्या कोणालाही काळजी करण्याची गरज नसल्याचे कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले.(AFP)
दरम्यान, श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये होत असलेली वाढ आणि नवीन JN.1 कोविड सब व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्याबाबत सर्वांनीच दक्ष राहून जगातील विविध देशांनी आपआपल्या आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे.  
(7 / 7)
दरम्यान, श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये होत असलेली वाढ आणि नवीन JN.1 कोविड सब व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्याबाबत सर्वांनीच दक्ष राहून जगातील विविध देशांनी आपआपल्या आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे.  (PTI)

    शेअर करा