मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PAK vs ENG Final: वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचं जंगी सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

PAK vs ENG Final: वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचं जंगी सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

Nov 14, 2022, 01:20 PMIST

PAK vs ENG Final England Cricket Team Wining Celebration: टी-20 विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. इंग्लंड दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपद मिळवले होते.

  • PAK vs ENG Final England Cricket Team Wining Celebration: टी-20 विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. इंग्लंड दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपद मिळवले होते.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड आणि अफगाणिस्तानसह इंग्लंडचा संघ ग्रुप-१ मध्ये होता. पहिल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानचा पराभव केला. यानंतर आयर्लंडविरुद्ध त्यांना डकवर्थ लुईस नियमानुसार पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना पावसामुळे वाहून गेला. अशा प्रकारे इंग्लंडचे ३ सामन्यांत केवळ ३ गुण होते. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला. मात्र, पॉइंट्स टेबलमध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी ७ गुण होते. पण नेट रनरेटच्या जोरावर न्यूझीलंड आणि इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली. सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव करून फायनलचे तिकीट पक्के केले.
(1 / 8)
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड आणि अफगाणिस्तानसह इंग्लंडचा संघ ग्रुप-१ मध्ये होता. पहिल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानचा पराभव केला. यानंतर आयर्लंडविरुद्ध त्यांना डकवर्थ लुईस नियमानुसार पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना पावसामुळे वाहून गेला. अशा प्रकारे इंग्लंडचे ३ सामन्यांत केवळ ३ गुण होते. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला. मात्र, पॉइंट्स टेबलमध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी ७ गुण होते. पण नेट रनरेटच्या जोरावर न्यूझीलंड आणि इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली. सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव करून फायनलचे तिकीट पक्के केले.(T20 World Cup twitter page)
मेलबर्नच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर इंग्लिश संघाने जेतेपदाचे जंगी सेलिब्रेशन केले. स्टोक्सने विजयी धाव घेताच संपूर्ण संघ त्याला मिठी मारण्याची मैदानावर धावला. त्यानंतर खेळाडूंची फॅमिली, मुले हेदेखील या सेलिब्रेशमध्ये सामिल झाली. सर्वांनी मिळून विजयाचा जल्लोष साजरा केला.
(2 / 8)
मेलबर्नच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर इंग्लिश संघाने जेतेपदाचे जंगी सेलिब्रेशन केले. स्टोक्सने विजयी धाव घेताच संपूर्ण संघ त्याला मिठी मारण्याची मैदानावर धावला. त्यानंतर खेळाडूंची फॅमिली, मुले हेदेखील या सेलिब्रेशमध्ये सामिल झाली. सर्वांनी मिळून विजयाचा जल्लोष साजरा केला. (T20 World Cup twitter page)
इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर पत्नी आणि मुलीसोबत.  जोस बटलरने आधी नाणेफेक जिंकली. त्याने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. त्यानंतर संपूर्ण गोलंदाजांकडून शिस्तबद्ध पद्धतीने कामगिरी करुन घेतली. फलंदाजीतबी बटलरने २६ धावा केल्या. पण या धावा संघाच्या खूप कामी आल्या. हेल्स पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतरही त्याने पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा केल्या.
(3 / 8)
इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर पत्नी आणि मुलीसोबत. जोस बटलरने आधी नाणेफेक जिंकली. त्याने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. त्यानंतर संपूर्ण गोलंदाजांकडून शिस्तबद्ध पद्धतीने कामगिरी करुन घेतली. फलंदाजीतबी बटलरने २६ धावा केल्या. पण या धावा संघाच्या खूप कामी आल्या. हेल्स पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतरही त्याने पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा केल्या.(T20 World Cup twitter page)
बेन स्टोक्सने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. १३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने हॅरी ब्रूकसोबत चौथ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ३९ धावांची अतिशय महत्वपूर्ण भागीदारी केली आणि त्यानंतर मोईन अलीसोबत ३३ चेंडूत ४७ धावा जोडल्या. अंतिम सामन्यात स्टोक्सने अर्धशतक झळकावले. स्टोक्स ४९ चेंडूत ५२ धावा करून नाबाद राहिला. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हे त्याचे पहिले अर्धशतक होते. (ENG Cricket Twitter Page)
(4 / 8)
बेन स्टोक्सने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. १३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने हॅरी ब्रूकसोबत चौथ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ३९ धावांची अतिशय महत्वपूर्ण भागीदारी केली आणि त्यानंतर मोईन अलीसोबत ३३ चेंडूत ४७ धावा जोडल्या. अंतिम सामन्यात स्टोक्सने अर्धशतक झळकावले. स्टोक्स ४९ चेंडूत ५२ धावा करून नाबाद राहिला. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हे त्याचे पहिले अर्धशतक होते. (ENG Cricket Twitter Page)(T20 World Cup twitter page)
इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात लेगस्पिनरचाआदिल रशीदची भूमिका निर्णायक ठरली. त्याने फायनलमध्ये ४ षटकात २२ धावा देत २ बळी घेतले. रशीदने १० डॉट बॉल टाकले.   आदिल रशीदच्या फिरकीमुळेच पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या सामन्यात रशीदने बाबर आझम आणि मोहम्मद हारीसची शिकार केली. तर मोईन अलीने दबावात महत्वपूर्ण १९ धावांची खेळी केली. त्याने बेन स्टोक्सवरील दबाव कमी करण्यात महत्वाची भुमिका बजावली.
(5 / 8)
इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात लेगस्पिनरचाआदिल रशीदची भूमिका निर्णायक ठरली. त्याने फायनलमध्ये ४ षटकात २२ धावा देत २ बळी घेतले. रशीदने १० डॉट बॉल टाकले. आदिल रशीदच्या फिरकीमुळेच पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या सामन्यात रशीदने बाबर आझम आणि मोहम्मद हारीसची शिकार केली. तर मोईन अलीने दबावात महत्वपूर्ण १९ धावांची खेळी केली. त्याने बेन स्टोक्सवरील दबाव कमी करण्यात महत्वाची भुमिका बजावली.(ENG Cricket Twitter Page)
इंग्लंडने हा वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांचे हेड कोच मॅथ्यू पॉट्स यांनी एक विक्रम रचला आहे. पॉट्स हे एकाच वर्षात दोन वर्ल्डकप जिंकणारे प्रशिक्षक ठरले आहेत. पॉट्स यांंनी याच वर्षी एप्रीलमध्ये ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून दिला होता. याच वर्षी एप्रिलमध्ये महिलांचा वनडे विश्वचषक खेळवला गेला होता. मॅथ्यू पॉट्स हे ऑस्ट्रेलिय महिला क्रिकेट संघाचे कोच होते.
(6 / 8)
इंग्लंडने हा वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांचे हेड कोच मॅथ्यू पॉट्स यांनी एक विक्रम रचला आहे. पॉट्स हे एकाच वर्षात दोन वर्ल्डकप जिंकणारे प्रशिक्षक ठरले आहेत. पॉट्स यांंनी याच वर्षी एप्रीलमध्ये ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून दिला होता. याच वर्षी एप्रिलमध्ये महिलांचा वनडे विश्वचषक खेळवला गेला होता. मॅथ्यू पॉट्स हे ऑस्ट्रेलिय महिला क्रिकेट संघाचे कोच होते.(ENG Cricket Twitter Page)
इंग्लंड दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपद मिळवले होते.
(7 / 8)
इंग्लंड दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपद मिळवले होते. (ENG Cricket Twitter Page)
 England Cricket Team Celebration
(8 / 8)
England Cricket Team Celebration

    शेअर करा