मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Prarthana Behere: आई होण्याविषयी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं मोठं वक्तव्य! म्हणाली ‘आम्हाला मूल नको कारण...’

Prarthana Behere: आई होण्याविषयी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं मोठं वक्तव्य! म्हणाली ‘आम्हाला मूल नको कारण...’

Apr 18, 2024, 06:03 PMIST

Actress Prarthana Behere: ‘पवित्र रिश्ता’सारख्या गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते.

मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे अभिनयासोबत, तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते. केवळ मराठीच नाही, तर प्रार्थनाने हिंदीतही आपलं नाव गाजवलं आहे. ‘पवित्र रिश्ता’सारख्या गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते. प्रार्थनाने अभिनय विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख मिळवली आहे. तिचे चित्रपट आणि मालिका देखील प्रचंड गाजल्या आहेत. काहीच महिन्यांपूर्वी तिची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.
(1 / 5)

प्रर्थनाच्या या मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. त्या मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे यांची ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, ही मालिका संपल्यानंतर आता प्रार्थना बेहेरेने काही काळाचा ब्रेक घेतला आहे. दरम्यानच्या काळात तिने दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थनाने मुंबई शहर सोडल्याचे देखील म्हटले. प्रार्थना आता तिच्या कुटुंबासोबत कायमची अलिबागमध्ये शिफ्ट झाली आहे. याचं कारण देखील तिने एका मुलाखतीत शेअर केलं होतं. यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील भाष्य केलं. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर देखील मुलबाळ नाही, या प्रश्नावर उत्तर देताना प्रार्थना म्हणाली की, मी आणि माझ्या नवऱ्यानं आम्ही मूल होऊ द्यायचं नाही असंच ठरवलं होतं.
(2 / 5)

प्रार्थना बेहेरेने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिलके करीब’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला. अलिबाग मध्ये जाऊन राहण्याविषयी बोलताना प्रार्थना म्हणाली की, अलिबागला आमची जागा खूप वर्षांपासून होती. माझ्या नवऱ्याच्या म्हणजेच अभीच्या आजोबांनी ती जागा घेतली होती. कोव्हिडच्या दरम्यान आम्ही ठरवलं की, ती जागा आता डेव्हलप करायची आणि तिथे राहायचं.
(3 / 5)

त्यानंतर रो-रो बोट सेवा सुरू झाली. आम्ही तिथे घर बांधलं. हळूहळू त्या घरी आम्ही घोडे, कुत्रे असे प्राणी देखील पाळले. प्राणी असल्यामुळे आम्हाला आठवड्यातून चार दिवस तिथे जावं लागायचं, तेव्हा आम्ही जुहूला राहत होतो आणि माझी मालिकाही सुरू होती. नंतर आम्ही ठरवलं की, आता आपण कायमस्वरूपी तिथेच राहायचं. तिथे गेल्यापासून आयुष्यात अनेक बदल घडले आहेत. तिथे गेल्यावर आम्हाला शांती आणि समाधान मिळाले. मुंबईच्या  धकाधकीच्या जीवनातून, ताणतणावातून मोकळीक मिळाली. त्या वातावरणात आमचे आयुष्य आणखी वाढले, असे वाटू लागले. 
(4 / 5)

तिकडे मी आता मेकअपशिवाय बिनधास्त फिरते. मी लावलेल्या झाडांची काळजी घेते. मला पेंटिंगची खूप आवड आहे, तिथे गेल्यापासून मी ही आवड देखील जोपासली आहे. प्रवासाच्या दृष्टीने थोडा त्रास झाला, पण आता त्याची सवय झाली आहे. आता आम्हाला तिथे जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. मूल जन्माला घालण्याविषयी बोलताना प्रार्थना म्हणाली की, मला कधीच मूल नको होतं. त्याऐवजी मला भरपूर प्राणी पाळायचे होते. माझं जेव्हा अभिषेक लग्न ठरलं, तेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याची देखील हीच इच्छा होती, हे आम्हाला कळलं. आम्हाला दोघांनाही प्राण्यांची प्रचंड आवड होती. त्यामुळे आम्ही मूल न होऊ देता, प्राण्यांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या या निर्णयाला आमच्या कुटुंबाचा देखील पाठिंबा आहे.
(5 / 5)

    शेअर करा