मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Firing In Lucknow : मोदींच्या विश्वासू मंत्र्याच्या बंगल्यात गोळीबार; तरुणाचा मृत्यू, तपास सुरू

Firing In Lucknow : मोदींच्या विश्वासू मंत्र्याच्या बंगल्यात गोळीबार; तरुणाचा मृत्यू, तपास सुरू

Sep 01, 2023, 12:13 PM IST

    • UP Firing News : केंद्रीय मंत्र्याच्या घरात तुफान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Kaushal Kishore House Firing Lucknow (HT_PRINT)

UP Firing News : केंद्रीय मंत्र्याच्या घरात तुफान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    • UP Firing News : केंद्रीय मंत्र्याच्या घरात तुफान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Kaushal Kishore House Firing Lucknow : मुंबईतील इंडिया आघाडीची बैठक सुरू असतानाच उत्तर प्रदेशातून खळबळजनक घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू आणि केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या बंगल्यात तुफान गोळीबार झाला आहे. गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून तो कौशल किशोर यांच्या मुलाचा मित्र असल्याचं बोललं जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपीने विकास कौशल यांच्या बंदुकीतून गोळी झाडली असून डोक्याला गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

Viral News : लग्नात 'स्मोक पान' खाल्ल्याने मुलीच्या पोटाला पडले छिद्र, मोठा भाग कापावा लागला

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा लखनौचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या लखनौतील बंगल्यात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. विनय श्रीवास्तव असं आरोपीच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. लखनौ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवल्याची माहिती लखनौचे डीसीपी राहुल राज यांनी दिली आहे. पोलिसांनी कौशल किशोर यांच्या बंगल्यातून एक बंदूक जप्त केली असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याचंही राहुल राज यांनी म्हटलं आहे.

कौशल किशोर यांच्या बंगल्यात गुरुवारी रात्री एकूण सहा लोक आले होते. सर्वांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर अचानक बंगल्यात गोळीबार सुरू झाला. आरोपीने केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर यांच्या बंदुकीतून गोळी झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी संपूर्ण बंगल्याची चौकशी सुरू केली असून तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीम नमुने गोळा करत असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचं लखनौ पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पुढील बातम्या