मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Who Is Vishnu Deo Sai: विष्णू देव साई आहेत तरी कोण? ज्यांना भाजपनं छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनवलं!

Who Is Vishnu Deo Sai: विष्णू देव साई आहेत तरी कोण? ज्यांना भाजपनं छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनवलं!

Dec 10, 2023, 05:24 PM IST

    • Vishnu Deo Sai Named Chhattisgarh Chief Minister: भाजप नेते विष्णू देव साई छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी संभाळतील.
Vishnu Deo Sai

Vishnu Deo Sai Named Chhattisgarh Chief Minister: भाजप नेते विष्णू देव साई छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी संभाळतील.

    • Vishnu Deo Sai Named Chhattisgarh Chief Minister: भाजप नेते विष्णू देव साई छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी संभाळतील.

Chhattisgarh New CM: भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री विष्णू देव साई यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे. आज भाजपच्या बैठकीत साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल सात दिवसांनी छत्तीसगडला नवा मुख्यमंत्री मिळत आहे. दरम्यान, छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आलेले विष्णू देव साई आहेत तरी कोण? हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

बाप रे..! दोन बहिणी चालवत होत्या आंतरराज्य सेक्स रॅकेट, आसाममधून आणत होत्या मुली

Naxalites Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, अर्जुन मुंडा, सर्वानंद सोनेवाल, दुष्यंत गौतम यांची छत्तीसगडचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यांच्यावर छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. छत्तीसगडच्या नव्या मुख्यमंत्रीच्या शर्यतीत रमन सिंह, भाजपा प्रदेशाध्यक्ष अरूण साव, रेणुका सिंह आणि ओ. पी. चौधरी यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, भाजपने या सगळ्यांना डावलून विष्णू देव साई यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली.

विष्णू देव साई कोण आहेत?

विष्णू देव साई हे आदिवासी समाजाचे मोठे नेते आहेत. विष्णु देव साई यांनी चार वेळा खासदार, दोनदा आमदारकी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी दोन वेळा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी संभाळली. त्यांना पक्षासोबत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी कुंकुरीची जागा जिंकली. प्रदेशाध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतरही त्यांनी सातत्याने पक्षासाठी काम केले.

राजकीय प्रवास

विष्णू देव साई यांनी १९८९ साली राजकीय प्रवास सुरू केला. सुरुवातीला ते गावचे सरपंच होते. दरम्यान, १९९० मध्ये भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना तापकरा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचे तिकीट दिले. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. यानंतर ते रायगड लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी १९९९ ते २०१४ पर्यंत त्यांनी सलग खासदारकीची निवडणूक जिंकली. यामुळे विष्णू देव साई यांना आदिवासी समाजाचा मोठा चेहरा मानला जातो.

विभाग

पुढील बातम्या