मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ins imphal : शत्रूचा थरकाप उडणार! ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं सुसज्ज आयएनएस इम्फाळ नौदलाच्या ताफ्यात

ins imphal : शत्रूचा थरकाप उडणार! ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं सुसज्ज आयएनएस इम्फाळ नौदलाच्या ताफ्यात

Dec 25, 2023, 03:11 PM IST

  • warship ins imphal : भारतीय नौदलात नवी युद्ध नौका दाखल होणार आहे. ही युद्धनौका ब्रम्होस क्षेपणास्त्राने सज्ज आहे. या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचे नाव देण्यात आले आहे. तब्बल ७ हजार ४०० टन वजन या जहाजाचे असून एकूण लांबी १६४ मीटर आहे.

warship ins imphal

warship ins imphal : भारतीय नौदलात नवी युद्ध नौका दाखल होणार आहे. ही युद्धनौका ब्रम्होस क्षेपणास्त्राने सज्ज आहे. या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचे नाव देण्यात आले आहे. तब्बल ७ हजार ४०० टन वजन या जहाजाचे असून एकूण लांबी १६४ मीटर आहे.

  • warship ins imphal : भारतीय नौदलात नवी युद्ध नौका दाखल होणार आहे. ही युद्धनौका ब्रम्होस क्षेपणास्त्राने सज्ज आहे. या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचे नाव देण्यात आले आहे. तब्बल ७ हजार ४०० टन वजन या जहाजाचे असून एकूण लांबी १६४ मीटर आहे.

warship ins imphal : भारतीय नौदलाच्या वाढत्या सामर्थ्यात भर पडणार आहे. शत्रूचा नायनाट करण्यासाठी आयएनएस इम्फाळ लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. उद्या मंगळवारी ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहे. आयएनएस इम्फाळमध्ये जमिनीवरुन जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करू शकणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले आहे. ही युद्ध नौका स्वदेशी बनावटीची असून स्टेल्थ प्रकारातील विनाशक जहाज आहे. ईशान्येकडील एखाद्या शहराचे नाव दिलेली ही पहिली युद्धनौका आहे. राष्ट्रपतींनी एप्रिल २०१९ मध्ये या युद्धनौकेच्या बांधणीला मंजुरी दिली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Jesus Christ Birthplace : ना ख्रिसमस ट्री ना सेलिब्रेशन! इस्राइल हमास युद्धामुळे प्रभू येशूचे जन्मस्थळ अंधारात

मंगळवारी मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे एका कार्यक्रमात या युद्धनौकेचे अनावरण करण्यात येणार असून औपचारिक पणे ही युद्ध नौका नौदलात दाखल होईल. या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उपस्थित राहणार आहेत. या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचे नाव देण्यात आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि समृद्धीसाठी ईशान्य भारताचे हे जहाज महत्त्व दर्शवते. या जहाजाचे वजन ७ हजार ४०० टन आहे. तर लांबी ही १६४ मीटर आहे. या जहाजावर जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम असलेले क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहे. तसेच ही युद्धनौका शत्रूची जहाज नष्ट करणारी क्षमता ठेवणारे आहे. ही युद्ध नौका क्षेपणास्त्रे आणि टॉर्पेडोने सुसज्ज ठेवण्यात आली आहे.

Mumbai Fire: मुंबईच्या चेंबूर परिसरातील एका निवासी इमारतीला आग

INS इम्फाळच्या सर्व समुद्री चाचण्या या यशस्वी झाल्या आहेत. यानंतर २० ऑक्टोबर रोजी आयएनएस इम्फाळ ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर गेल्या महिन्यात या जहाजावरुन लांब पल्ल्याच्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. कोणत्याही स्वदेशी युद्धनौकेचा नौदलात समावेश होण्यापूर्वी अशा प्रकारची करण्यात आलेली ही पहिलीच चाचणी होती. या चाचणीतील यशाने भारतीय नौदलाचे मनोबल वाढणार आहे. त्याचबरोबर नौदलाच्या सामर्थ्यात नवीन भर पडणार आहे.

हिंद महासागरात चीनच्या आव्हाहनाला तोंड देण्यास भारत सक्षम

भारतीय नौदल मजबूत करण्यासाठी स्वदेशी कारणाला मोठे महत्व देण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून देशात विविध युद्ध नौकांची बांधणी केली जात आहे. या युद्ध नौकेमुळे हिंद महासागरात चीनी कुरपतींवर लक्ष ठेवण्यास मदत मिळणार आहे.

विभाग

पुढील बातम्या