Jesus Christ Birthplace : ना ख्रिसमस ट्री ना सेलिब्रेशन! इस्राइल हमास युद्धामुळे प्रभू येशूचे जन्मस्थळ अंधारात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jesus Christ Birthplace : ना ख्रिसमस ट्री ना सेलिब्रेशन! इस्राइल हमास युद्धामुळे प्रभू येशूचे जन्मस्थळ अंधारात

Jesus Christ Birthplace : ना ख्रिसमस ट्री ना सेलिब्रेशन! इस्राइल हमास युद्धामुळे प्रभू येशूचे जन्मस्थळ अंधारात

Published Dec 25, 2023 01:52 PM IST

Jesus Christ Birthplace : प्रभू येशूचे जन्मस्थळ असलेल्या बेथलेहेम शहरात दरवर्षी उत्साह असतो. मात्र, या वर्षी हमास इस्राइल संघर्षामुळे या ठिकाणी कोणताही जल्लोष अथवा उत्साह दिसून येत नाही.

Jesus Christ Birthplace
Jesus Christ Birthplace

Jesus Christ Birthplace : जगभरात आज ख्रिसमस सण साजरा केला जात आहे. आज ख्रिश्चन प्रभू येशूचा जन्मदिवस आहे. प्रभू येशू यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाल्याचे ख्रिश्चन धर्मीय मानतात. दरवर्षी या ठिकाणी जल्लोष असतो. मात्र, यावेळी या शहरात शांतता आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे तसेच इस्रायली हल्ल्यांमुळे पर्यटक आणि यात्रेकरू या पॅलेस्टिनी शहरापासून लांब आहेत.

Dhirendra Shastri : बागेश्वर बाबा म्हणतात, मुली मागे लागल्यात, जीव द्यायची धमकी देतात! आता लग्न करणार

गेल्या वर्षी ख्रिसमसला पॅलेस्टिनी शहर बेथलेहेम गजबजलेले होते. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आले होते. मात्र, या वर्षी हमास आणि इस्राइल युद्धामुळे हे शहर ओसाड पडले आहे. बॉम्ब हल्ले आणि गोळीबारामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वर्षी पर्यटक या युद्धामुळे आलेले नाही. परीमणी येथील हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसाईकांचे नुकसान झाले आहे. तसेच हे शहर ओसाड पडले आहे. या ठिकाणी फक्त लष्कराचा वावर दिसत आहे.

Paytm layoffs : पेटीएमनं १००० लोकांना नोकरीवरून काढलं! कारण ऐकून तुमचंही टेन्शन वाढेल

बेथलेहेमची अर्थव्यवस्था प्रामुख्याने जगभरातून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. चर्च ऑफ द नेटिव्हिटी पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात. ख्रिश्चनांच्या मते या ठिकाणी प्रभू येशूचा जन्म झाला.

इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम

खरे तर दक्षिण इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संघर्ष उफाळला आहे. हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्य गाझासह अनेक पॅलेस्टिनी शहरांवर हल्ले करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत २० हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात बहुतांश महिला आणि लहान मुले यांचा समावेश आहे. प्रभु येशूचे जन्मस्थान बेथलेहेम देखील इस्रायली हल्ल्यांपासून लांब राहिलेले नाही. या युद्धामुळे पर्यटक येथून लांब असल्याचे स्थानिक नागरीक सांगतात.

सध्या सरू असलेल्या युद्धामुळे आमच्याकडे कोणीही येत नाही, असे अलेक्झांडर हॉटेलचे मालक जॉय कॅनवती यांनी सांगितले. येथील शहरातील बहुतांश लोकसंख्या पर्यटनावर अवलंबून आहे. असेही ते म्हणाले, "हा आतापर्यंतचा सर्वात वाईट ख्रिसमस आहे. बेथलेहेम शहर बंद असल्याने या वर्षी येथे ख्रिसमसच उत्साह नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर