मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  INS Vindhyagiri : शत्रुंना धडकी भरवणारी विंध्यगिरी युद्धनौका सैन्यात दाखल, राष्ट्रपती मुर्मूंनी दिला ग्रीन सिग्नल

INS Vindhyagiri : शत्रुंना धडकी भरवणारी विंध्यगिरी युद्धनौका सैन्यात दाखल, राष्ट्रपती मुर्मूंनी दिला ग्रीन सिग्नल

Aug 18, 2023, 11:25 AM IST

    • INS Vindhyagiri : भारतीय हवाई दलात नवीन युद्धनौका सामील करण्यात आली आहे. त्यामुळं नौदल अधिक सशक्त आणि बळकट होणार आहे.
Confetti and smoke in the colors of the Indian national flag mark the entry of INS Vindhyagiri, a new warship for the Indian navy, into the Hooghly river in Kolkata, India, Thursday, Aug. 17, 2023. This P17A series warship, built by the Garden Reach Shipbuilders and Engineers in Kolkata, was launched by the Indian President Droupadi Murmu Thursday. (AP Photo/Bikas Das) (AP)

INS Vindhyagiri : भारतीय हवाई दलात नवीन युद्धनौका सामील करण्यात आली आहे. त्यामुळं नौदल अधिक सशक्त आणि बळकट होणार आहे.

    • INS Vindhyagiri : भारतीय हवाई दलात नवीन युद्धनौका सामील करण्यात आली आहे. त्यामुळं नौदल अधिक सशक्त आणि बळकट होणार आहे.

INS Vindhyagiri Launch : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे आयएनएस विंध्यगिरी या युद्धनौकेचं जलावरणाचा कार्यक्रम पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नव्या युद्धनौकेचं जलावरण करण्यात आलं असून यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील उपस्थित होत्या. आएनएस विंध्यगिरी ही अत्याधुनिक युद्धनौका असून बंगालच्या हुगळी नदीच्या किनाऱ्यावर या युद्धनौकेच्या जलावरणाचा कार्यक्रम पार पडला आहे. आकाश, जमीन आणि पाण्याखालून होणारे हल्ले परतवून लावण्याची क्षमता विंध्यगिरी या युद्धनौकेत आहे. अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज झालेल्या या युद्धनौकेच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता विंध्यगिरी युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air Force Recruitment 2024: भारतीय वायुसेनेत नोकरी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

भारताच्या राष्ट्रपती आणि देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुख द्रौपदी मुर्मू यांनी विंध्यगिरी या युद्धनौकेचं जलावरण केलं आहे. निलगिरी क्लासची ही फ्रिगेट एक स्टेल्थ गाइडेड मिसाईल युद्धनौका आहे. त्यामुळं आता या युद्धनौकेमुळं भारतीय सैन्य दलाला मोठा फायदा होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शत्रुच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयएनएस विंध्यगिरी या युद्धनौकेवर काम सुरू होतं. युद्धनौका तयार करण्यात आल्यानंतर तिच्या सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. आएनएस विंध्यगिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात करता येणार असून दोन हेलिकॉप्टरही या युद्धनौकेवर असतील. त्यामुळं आता चीन आणि पाकिस्तानला धडकी भरण्याची शक्यता आहे.

आएनएस विंध्यगिरी या युद्धनौकेत अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर्स आणि ऑटो मेलारा गनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळं शत्रु राष्ट्रांच्या जहाजावर किंवा हेलिकॉप्टरवर सहज थेट हल्ला करता येऊ शकतो. याशिवाय विंध्यगिरी युद्धनौका क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम असल्याने त्यामुळं त्याचा अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातही वापर करता येणार आहे. नव्या युद्धनौकेत अत्याधुनिक रडार प्रणाली, प्रगत हत्यारं, व्यवस्थापन प्रणाली आणि पाणबुडीविरोधी शस्त्र प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळं ही अत्याधुनिक युद्धनौका भारतीय सैन्यात सामील होणार असल्याने त्यामुळं नौदलाची मोठी ताकद वाढणार आहे.

पुढील बातम्या