मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढणार; मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढणार; मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 18, 2023 08:48 AM IST

Maharashtra Rain Update : आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं आता बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update (HT)

Maharashtra Weather Update : जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर महाराष्ट्रात पुनरागमन केलं आहे. गुरुवार पासून मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. त्यानंतर आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील ४८ तासांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळं आता वरुणराजा बरसणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं हवामान खात्याने दोन्ही विभागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये गुरुवार पासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळं खरीप हंगामातील पीकं संकटात सापडली होती. परंतु आता पावसाचं पुनरागमन होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मुंबई, पुणे आणि कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाचं आगमन होणार असल्याने अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. उद्यापासून म्हणजेच १९ ऑगस्टपासून पुढील दोन आठवडे राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

WhatsApp channel