मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अपघात झाल्यानंतर रात्रभर मृतदेहावरून गाड्या गेल्या; फावड्यानं मांस गोळा करून तरुणावर अंत्यसंस्कार

अपघात झाल्यानंतर रात्रभर मृतदेहावरून गाड्या गेल्या; फावड्यानं मांस गोळा करून तरुणावर अंत्यसंस्कार

Jan 04, 2023, 10:28 AM IST

    • Road Accident : रस्त्यावरून जात असताना तरुणाला एका अज्ञात वाहनानं धडक दिली होती. त्यानंतर जखमी झालेल्या तरुणाच्या अंगावरून अनेक वाहनं गेल्यानं त्याचा मृत्यू झाला.
road accident in agra uttar pradesh today (HT)

Road Accident : रस्त्यावरून जात असताना तरुणाला एका अज्ञात वाहनानं धडक दिली होती. त्यानंतर जखमी झालेल्या तरुणाच्या अंगावरून अनेक वाहनं गेल्यानं त्याचा मृत्यू झाला.

    • Road Accident : रस्त्यावरून जात असताना तरुणाला एका अज्ञात वाहनानं धडक दिली होती. त्यानंतर जखमी झालेल्या तरुणाच्या अंगावरून अनेक वाहनं गेल्यानं त्याचा मृत्यू झाला.

road accident in agra uttar pradesh today : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गेलेल्या तरुणाला महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव वाहनानं धडक दिली. संध्याकाळी ही घटना घडल्यानं कुणाच्या लक्षातच आलं नाही. परिणामी रात्रीच्या काळोखात हजारो वाहनं मृत तरुणाच्या मृतदेहावरून गेल्याची थरारक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्र्यात अंगावर काटा आणणारी ही घटना घडली असून त्यानंतर सकाळी या घटनेबाबत समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्याला चिपकलेला तरुणाचा मृतदेह फावड्याच्या सहाय्यानं खोदून काढण्यात आला आहे. त्यामुळं संपूर्ण आग्रा जिल्ह्यात खळबळ उडाली असून या भयावह घटनेमुळं अनेकांना मानसिक धक्का बसला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बर्ड फ्लूचे संकट! केरळनंतर उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी, प्रत्येक जिल्ह्यातील पक्षांचे नमुने तपासणार

ट्रकच्या धडकेत नोटांच्या बंडलांनी भरलेला 'छोटा हत्ती' पलटला, रस्त्यावर पसरले ७ कोटींची रक्कम

Narendra Modi : भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले, कोण आहे ही ८० वर्षीय वृद्ध महिला

धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

मिळालेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गेलेल्या तरुणाला उत्तर प्रदेशातील आग्रा-मथुरा महामार्गावर एका अज्ञात वाहनानं घडक दिली होती. त्यानंतर जखमी झालेला तरुण रस्त्यावर बेशूद्ध झाला. परंतु संध्याकाळची वेळ असल्यानं घडलेला प्रसंग कुणाच्याही लक्षात आला नाही. त्यामुळं रात्री अंधार पडल्यानं हजारो वाहनं तरुणाच्या मृतदेहावरून गेली. त्यामुळं तरुणाच्या शरीराचे अनेक पार्ट्सचे बारिक बारिक तुकडे होऊन डांबराला चिकटून कडक झाले होते. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे डांबराला चिकटलेले तुकडे फावड्यानं उकरून एका पॉलिथिनमध्ये भरून अंत्यसंस्कारासाठी पाठवलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील आरोपी वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

आग्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव गौरव चरन नरवारिया असून तो मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यातला आहे. या घटनेबाबत तरुणाच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं असून मृतदेह गोळा करण्यात आल्याचीही माहिती त्यांना देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता आरोपी वाहनचालकाच्या अटकेसाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज चेक केले जात असल्याचं आग्रा पोलिसांनी सांगितलं आहे.

पुढील बातम्या