मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UPSC Prelims news : यूपीएससी परीक्षेचे हॉल तिकीट जारी, एका क्लिकवर करा डाऊनलोड

UPSC Prelims news : यूपीएससी परीक्षेचे हॉल तिकीट जारी, एका क्लिकवर करा डाऊनलोड

May 09, 2023, 10:52 AM IST

  • UPSC prelims 2023 admit cards: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

UPSC

UPSC prelims 2023 admit cards: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

  • UPSC prelims 2023 admit cards: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

UPSC Prelims 2023 Admit Card: यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने सीएसईच्या पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाई www.upsc.gov.in वरुन आपलं हॉल तिकिट डाऊनलोड करु शकतात. देशभरातील विविध ठिकाणी २८ मे २०२३ रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट कसे डाऊनलोड करायचे? याबाबत जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Hanooman AI : भारताचे पहिले स्वदेशी AI टूल ‘हनुमान’ लाँच, मोफत वापरण्याची जाणून घ्या ट्रिक

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, गुणपत्रिका 'अशी' पाहा ऑनलाइन!

यूपीएससीच्या सीएसईच्या पूर्व परीक्षेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला १ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. तर, २१ फेब्रुवारी नोंदणीकरणाची शेवटची तारीख होती. या काळात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणांनी अर्ज केला आहे. पूर्व परीक्षेत उतीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, १ हजार १०५ जागांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी जवळपास ११ लाख उमेदवारांनी अर्ज केला आहे.

MPSCच्या जवळपास १ लाख विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रं सोशल मीडियावर व्हायरल, आयोगाकडून तात्काळ स्पष्टीकरण

असे डाऊनलोड करा हॉलतिकीट?

> सर्वप्रथम उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in वर भेट द्या.

> त्यानंतर तुम्हाला ई-अ‍ॅडमिट कार्ड: सिव्हिल सर्व्हिसेस (प्राथमिक) परीक्षा २०२३ असे दिसेल, त्यावर क्लिक करा.

> नंतर उमेदवार त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि लॉग इन करा.

> आता उमेदवाराचे हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल्.

> त्यानंतर उमेदवाराला हॉल तिकीट डाउनलोड करता येईल.

> हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर प्रिंट आउट काढा.

विभाग

पुढील बातम्या