मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Honduran Jail Riot : महिला कैद्यांचा कारागृहात एकमेकांवर गोळीबार, तब्बल ४१ जणींचा मृत्यू

Honduran Jail Riot : महिला कैद्यांचा कारागृहात एकमेकांवर गोळीबार, तब्बल ४१ जणींचा मृत्यू

Jun 21, 2023, 11:11 AM IST

    • Honduran Jail Firing : कारागृहातील महिलांनी एकमेकांवर केलेल्या तुफान गोळीबारात तब्बल ४१ महिला कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Honduran Jail Firing (HT)

Honduran Jail Firing : कारागृहातील महिलांनी एकमेकांवर केलेल्या तुफान गोळीबारात तब्बल ४१ महिला कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

    • Honduran Jail Firing : कारागृहातील महिलांनी एकमेकांवर केलेल्या तुफान गोळीबारात तब्बल ४१ महिला कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Firing in Honduran Jail : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीची घटना ताजी असतानाच आता होंडुरास या देशातून धक्कादायक घटना समोर आली आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांच्या दोन गटात तुफान गोळीबार झाला आहे. या जेलमधील दंगलीत आतापर्यंत ४१ महिला कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती तुरुंग प्रशासनाच्या प्रमुख जुलिसा विलानुएवा यांनी दिली आहे. महिला कैद्यांमध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला होता, त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. परंतु त्यानंतर दोन गटात पुन्हा राडा झाला. दोन्ही गटातील महिला कैद्यांनी एकमेकांवर गोळीबार केला, त्यात ४१ महिला कैद्यांचा मृत्यू झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

मिळालेल्या माहितीनुसार, होंडुरास या देशातील कारागृहात शेकडो महिला कैद्यांना ठेवण्यात आलं आहे. मंगळवारी जेलमधील महिला कैद्यांच्या दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी अचानक जाळपोळ करत गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यात ४१ महिला कैद्यांना जीव गमवावा लागला आहे. गोळीबारापेक्षा जाळपोळीत सर्वाधिक कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तसेच जखमींचा आकडा जास्त असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर आता कारागृहात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच स्थिती नियंत्रणात आणण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

महिला कैद्यांचा एक गट कारागृहात अंमली पदार्थांची विक्री करत होता, तसेच मोबाईल आणि अन्य आक्षेपार्ह साहित्य त्यांच्याकडे आढळून आल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु त्याला विरोध करत तुरुंगातील महिलांचे दोन गट आमने-सामने आले. त्यामुळं जाळपोळ आणि गोळीबारात आतापर्यंत ४१ महिला कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विभाग

पुढील बातम्या