Titanic Tourist Missing : टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या अब्जाधीशाची पाणबुडी बेपत्ता; अमेरिका-कॅनडाकडून शोधकार्य जारी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Titanic Tourist Missing : टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या अब्जाधीशाची पाणबुडी बेपत्ता; अमेरिका-कॅनडाकडून शोधकार्य जारी

Titanic Tourist Missing : टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या अब्जाधीशाची पाणबुडी बेपत्ता; अमेरिका-कॅनडाकडून शोधकार्य जारी

Published Jun 21, 2023 09:49 AM IST

Titanic Tourist Missing : टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची पाणबुडी अटलांटिक महासागरातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

Titanic Submarine Missing
Titanic Submarine Missing (AP)

Titanic Submarine Missing : अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची पाणबुडी समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. रविवारपासून पाणबुडीचा संपर्क तुटला असून पुढील ७० तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा पाणबुडीत शिल्लक आहे. पायलट आणि चार पर्यटक पाणबुडीद्वारे अटलांटिक महासागरात गेले होते. त्यात इंग्लंडमधील अब्जाधीश हामिश हार्डिंग यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता या घटनेनंतर अमेरिका आणि कॅनडा या देशांकडून बेपत्ता पाणबुडीची शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. पाणबुडीतील पर्यटक आणि पायलट जिवंत आहे की नाही, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु पाणबुडीत मोजकाच ऑक्सिजनचा साठा उरलेला असल्याने पर्यटकांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा या तीन देशांकडून अटलांटिक महासागरात पाणबुडीला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक पाणबुड्या आणि हवाई दलाद्वारे पर्यटकांचा शोध घेतला जात आहे. इंग्लंडमधील कोट्यधीश हामिश हार्डिंग यांचाही बेपत्ता पर्यटकांमध्ये समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावरून टायटॅनिक पाहण्यासाठी समुद्रात जाणार असल्याची माहिती दिली होती. याशिवाय आफ्रिकेतून भारतात चित्ते आणण्यासाठी देखील त्यांचा मोठा सहभाग असल्याची माहिती आहे. हामिश हार्डिंग यांनी दोन कोटी रुपये खर्च करत टायटॅनिकचे अवशेष पाहण्याची योजना आखली होती. त्यानुसार त्यांनी चार साथीदार आणि एका पायलटला सोबत घेत महासागराच्या तळाला गेले होते.

रविवारपासून त्यांच्या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे. त्यामुळं अमेरिका आणि युरोपमध्ये खळबळ उडाली असून अनेक देशांनी पाणबुडी शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कॅनडाजवळीत समुद्रात टायटॅनिकचे अवशेष आहे, दरवर्षी अनेक पर्यटक कोट्यवधी रुपये खर्च करून टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी समुद्रात जात असतात. १९१२ साली टायटॅनिक जहाज हिमनगाला आदळल्याने समुद्रात बुडालं होतं. त्यानंतर १५०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर