मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  New Maxico US Firing : अमेरिकेतील मॅक्सिकोत अंदाधुंद गोळीबार, तीन लोकांचा मृत्यू, आठ जखमी

New Maxico US Firing : अमेरिकेतील मॅक्सिकोत अंदाधुंद गोळीबार, तीन लोकांचा मृत्यू, आठ जखमी

May 16, 2023, 07:56 AM IST

    • Maxico US Firing : अमेरिकेतल्या मॅक्सिकोत हल्लेखोराने तुफान गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.
Maxico America Firing News (HT)

Maxico US Firing : अमेरिकेतल्या मॅक्सिकोत हल्लेखोराने तुफान गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

    • Maxico US Firing : अमेरिकेतल्या मॅक्सिकोत हल्लेखोराने तुफान गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

Maxico America Firing News : अमेरिकेतील फ्लोरिडात झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता न्यू मॅक्सिकोत १८ वर्षीय हल्लेखोराने रस्त्यावरून चालणाऱ्यांवर तुफान गोळीबार केला आहे. या घटनेत तीन लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दोन पोलीस अधिकाऱ्यांसह आठ जण जखमी झाले आहे. त्यामुळं अमेरिकेत खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला गोळ्या घालून ठार मारलं आहे. न्यू मॅक्सिको शहरातील वायव्य भागातील फार्मिंग्टन परिसरात ही घटना घडली आहे. त्यामुळं आता शहरातील अनेक भागांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील न्यू मॅक्सिको शहरातील फार्मिंग्टन परिसरात अनेक लोक सकाळी मॉर्निक वॉकसाठी बाहेर पडले होते. त्यावेळी समोरून येत असलेल्या एका १८ वर्षीय हल्लेखोराने अचानक अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. आरोपीने केलेल्या गोळीबारात तीन लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन पोलीस अधिकाऱ्यांसह आठ जण जखमी झाले आहे. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सशस्त्र जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला गोळ्या घालून घटनास्थळीच ठार मारलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात अज्ञा आरोपीने केलेल्या गोळीबारात दहा लोकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय न्यूयॉर्क तसेच न्यू जर्सी या शहरांमध्ये देखील गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता न्यू मॅक्सिको शहरात झालेल्या गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता अमेरिकेत सतत होत असलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळं संताप व्यक्त केला जात आहे.

विभाग

पुढील बातम्या