मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  sukma naxal encounter : छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, ३-४ नक्षलवादी ठार, चकमक सुरूच

sukma naxal encounter : छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, ३-४ नक्षलवादी ठार, चकमक सुरूच

Dec 23, 2023, 04:16 PM IST

    • sukma naxal encounter : सुकमा येथे गोगुंडा भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू असून सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ३.४ नक्षलवादी ठार झाले आहेत तर काही जण जखमी झाले आहेत.
sukma naxal encounter

sukma naxal encounter : सुकमा येथे गोगुंडा भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू असून सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ३.४ नक्षलवादी ठार झाले आहेत तर काही जण जखमी झाले आहेत.

    • sukma naxal encounter : सुकमा येथे गोगुंडा भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू असून सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ३.४ नक्षलवादी ठार झाले आहेत तर काही जण जखमी झाले आहेत.

sukma naxal encounter : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत आतापर्यंत ३ ते ४ नक्षलवादी ठार झाले आहेत. सुकमाच्या गोगुंडा भागात ही चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. गोळीबारात काही जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. पोलिसांना या कारवाईत मोठे यश मिळाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Naxalites Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Kejriwal Gets Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

Pune Police attack : पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला; दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

सुकमा डीआरजी, दंतेवाडा डीआरजी, सीआरपीएफ २ री बटालियन आणि सीआरपीएफ १११ बटालियन यांनी ही कारवाई संयुक्तपणे केली आहे. सुरक्षा दल ज्या ठिकाणी नियमित गस्त घालत होते. यावेळी त्यांना नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती सूत्रांकडून मिळाली, त्यानंतर सुरक्षा दलाचे पथकाने नक्षल्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.

Traffic news : सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर कोंडीची शक्यता; अवजड वाहनांनी 'ही' वेळ टाळावी!

सुकमाचे एसपी किरण चव्हाण आणि सीआरपीएफचे डीआयजी एरविंद राय यांनी सांगितले की ते या चकमकीवर लक्ष ठेवून आहेत. सुरक्षा दलाच्या पथकाने नक्षलवाद्यांना घेरले आहे. चकमक सुरूच आहे.

सुकमा येथील चकमकीची ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि अरुण साओ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देत छत्तीसगडमध्ये आता डबल इंजिनचे सरकार नसल्याचे संगीतले होते. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

विभाग

पुढील बातम्या