मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SAIL Trainee Recruitment 2022: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये २०० पदांसाठी भरती!

SAIL Trainee Recruitment 2022: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये २०० पदांसाठी भरती!

Aug 03, 2022, 03:35 PM IST

    • Job Search: अर्जाची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल. तर, अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२२ आहे.
नोकरीची संधी (HT)

Job Search: अर्जाची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल. तर, अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२२ आहे.

    • Job Search: अर्जाची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल. तर, अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२२ आहे.

Steel Authority of India Limited Trainee Recruitment 2022: भारतीय स्टील प्राधिकरणाने प्रशिक्षणार्थी पदाच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. SAIL च्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कंपनीच्या igh.sailrsp.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. अर्जाची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल. तर, अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२२ आहे. SAIL च्या या भरतीद्वारे प्रशिक्षणार्थीच्या एकूण २०० पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तुम्ही SAIL प्रशिक्षणार्थी भरती अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि रिक्त जागा तपशील याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

रिक्त जागांचा तपशील:

मेडिकल अटेंडेंट ट्रेनिंग: १०० पदे

क्रिटिकल केयर नर्सिंग ट्रेनिंग: २० पदे

अॅडवांस्ड स्पेशलाइज्ड नर्सिंग ट्रेनिंग (एएसएनटी): ४० पदे

डाटा एंट्री ऑपरेटर / मेडिकल ट्रांसक्रिप्शन ट्रेनिंग: ६ पदे

मेडिकल लॅब/ टेकनीशियन प्रशिक्षण: १० पदे

हॉस्पिटल प्रशासन प्रशिक्षण: १० पदे

ओटी/एनेस्थीसिया असिस्टेंट ट्रेनिंग: ५ पदे

अॅडवांस्ड फिजियोथेरेपी ट्रेनिंग: ३ पदे

रेडियोग्राफर ट्रेनिंग: ३ पदे

फार्मासिस्ट ट्रेनिंग: ३ पदे

अर्ज पात्रता

पदानुसार, उमेदवारांनी संबंधित विषयात पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. अर्जाची पात्रता आणि वयोमर्यादा इत्यादींबद्दल तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांना भरती अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो.

निवड प्रक्रिया

प्रशिक्षणार्थी पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. पात्र उमेदवारांना दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीचे ठिकाण, वेळ आणि तारीख याबाबतची माहिती उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवली जाईल. यासोबतच मुलाखतीचे वेळापत्रकही कंपनीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

‘असा' करा अर्ज

http://igh.sailrsp.co.in या वेबसाइटला भेट द्या.

“what’s new” या लिंकवर क्लिक करा. अर्ज फक्त ऑनलाइनच स्वीकारले जातील.

पुढील पृष्ठावर, दोन पर्याय उपलब्ध असतील - पहिला पर्याय "ऑनलाइन अर्ज" आणि दुसरा - अर्ज "सबमिट" करण्यासाठी.

नोंदणी केल्यानंतर, तुमच्या आयडीने लॉगिन करा आणि अर्ज भरा आणि सबमिट करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढा किंवा पीडीएफ सेव्ह करा.

अर्जाची छपाई करताना, तीन फॉर्म असतील - भरलेला अर्ज, घोषणा फॉर्म आणि दस्तऐवज पडताळणी फॉर्म.

या अर्जावर आवश्यक तेथे सही करा आणि तुमचा फोटो चिकटवा.

लक्षात ठेवा की अपूर्ण अर्ज नाकारला जाईल. याबाबत कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.

 

विभाग

पुढील बातम्या