मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  RSS MP : आरएसएसमध्ये फूट; माजी प्रचारकांनी केली नव्या पक्षाची घोषणा, भाजपचं टेन्शन वाढणार

RSS MP : आरएसएसमध्ये फूट; माजी प्रचारकांनी केली नव्या पक्षाची घोषणा, भाजपचं टेन्शन वाढणार

Sep 11, 2023, 12:05 PM IST

  • New political party in Madhya Pradesh : काही दिवसांनी निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या मध्य प्रदेशात भाजपचं टेन्शन अधिकच वाढलं आहे.

RSS

New political party in Madhya Pradesh : काही दिवसांनी निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या मध्य प्रदेशात भाजपचं टेन्शन अधिकच वाढलं आहे.

  • New political party in Madhya Pradesh : काही दिवसांनी निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या मध्य प्रदेशात भाजपचं टेन्शन अधिकच वाढलं आहे.

Madhya pradesh politics : इंडिया आघाडीच्या रूपानं राष्ट्रीय पातळीवर नवं आव्हान उभं राहिलं असतानाच मध्य प्रदेशात भाजपची चिंता अधिकच वाढली आहे. काही महिन्यांतच विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या मध्य प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) माजी प्रचारकांनी थेट नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. त्याचा थेट फटका भाजपला बसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बर्ड फ्लूचे संकट! केरळनंतर उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी, प्रत्येक जिल्ह्यातील पक्षांचे नमुने तपासणार

ट्रकच्या धडकेत नोटांच्या बंडलांनी भरलेला 'छोटा हत्ती' पलटला, रस्त्यावर पसरले ७ कोटींची रक्कम

Narendra Modi : भरसभेत पंतप्रधान मोदी ‘या’ महिलेच्या पाया पडले, कोण आहे ही ८० वर्षीय वृद्ध महिला

धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

आरएसएसचे माजी प्रचारक अभय जैन यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जवळच्या मिसरोद इथं आपल्या सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करून त्यामागची भूमिका स्पष्ट केली. आम्ही काही माजी प्रचारकांनी मिळून नवा पक्ष स्थापन केला आहे. 'जनहित पार्टी' असं पक्षाचं नाव आहे, असं जैन यांनी सांगितलं.

'सध्याच्या सर्व राजकीय पक्षांची संस्कृती आणि वाटचाल लोकशाहीच्या गाभ्याच्या विरोधात होताना दिसत आहे. लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यात हे पक्ष अपयशी ठरले आहेत. या त्रुटी दूर करण्याचा आमचा उद्देश आहे. याशिवाय, प्रशासकीय सुधारणांसाठी राजकीय पक्षांवर दबाव वाढवण्याचं काम देखील आमचा पक्ष करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपची मतं फुटणार?

मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. आमच्या पक्षाची अद्याप नोंदणी झाली नसली तरी सत्ताधारी भाजपची मतं आमच्या उमेदवारांना मिळतील अशी आशा आहे. २०१८ च्या निवडणुकीत आमचा पक्ष नसतानाही भाजपचा पराभव झाला होता, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.

भाजपच्या कारभारावर जनता नाराज

मध्य प्रदेशातील जनता शिवराज सिंह चौहान यांच्या कारभारावर समाधानी नाही. अशा परिस्थिती आम्ही मैदानात उतरलो तर बरीच उलथापालथ होईल. भाजपवर नाराज असलेले पण हिंदू विचारांचे लोक आमच्याकडं वळतील. भाजपची मतं काँग्रेसला मिळणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. 'आमचं लक्ष्य दूरचं आहे. सध्या आम्ही केवळ मध्य प्रदेशवर लक्ष केंद्रीत करणार आहोत. त्यानंतर देशभरात विस्ताराचा विचार केला जाईल, असं अभय जैन यांनी सांगितलं. राज्याच्या विविध भागातील आरएसएसचे माजी प्रचारक जैन यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते.

विभाग

पुढील बातम्या