मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit pawar : "...तर राजकारणातून निवृत्ती घेईल; आम्हीपण मराठ्याची अवलाद, अजित पवारांनी कोल्हापुरात ठोकला शड्डू!

Ajit pawar : "...तर राजकारणातून निवृत्ती घेईल; आम्हीपण मराठ्याची अवलाद, अजित पवारांनी कोल्हापुरात ठोकला शड्डू!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 10, 2023 11:43 PM IST

Ajit pawar in kolhapur : आपल्या सभांमध्ये शरद पवारांनी बंडखोर नेत्यांचा समाचार घेतला होता. त्यावर आता अजित पवार यांनी कोल्हापूरात सभा घेत घणाघात केला आहे. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका केली.

Ajit pawar
Ajit pawar

Ajit Pawar In Kolhapur Rally : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवारांनी राज्यभरात झंझावाती दौरे सुरू केले आहेत. शरद पवारांनी सभा घेतलेल्या ठिकाणी अजित पवार उत्तरदायित्व सभा घेऊन उत्तरे देत आहेत. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी केल्हापूरात सभा घेतली होती. आता कोल्हापुरातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तरदायित्व सभा घेतली आहे. या सभेला मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

ट्रेंडिंग न्यूज

शरद पवारांनी बीड आणि कोल्हापूरमध्ये सभा घेत अजित पवार गटातील नेत्यांवर आसुड ओढले होते. त्यावेळी शरद पवारांनी इतर बंडखोर नेत्यांचा समाचार घेतला. त्यावर आता अजित पवार यांनी कोल्हापूरात सभा घेत घणाघात केला आहे. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका केली.

अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळताना भाजपसोबत सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा राष्ट्रवादीच्या ५२ आमदारांची होती. सत्तेत सहभागी होण्याबाबत ५२ आमदारांच्या सहीचं पत्रही होतं.एक दोन आमदार सोडलं तर सर्वांनी ठरवलं होतं की महायुतीमध्ये सामील व्हायचं. हे जर खरं नसेल तर मी राजकारणातून निवृत्त होईल. मात्र खरं असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

काही लोकं म्हणतात अजित पवार यांनी असा निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणता दबाव होता का? त्यानंतर काहींनी आमच्यावर टीका केली.  नक्कीच आमच्यावर दबाव होता, मात्र लोकांची कामं पूर्ण करण्याचा दबाव होता. मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, मी देखील मराठ्याची अवलाद आहे. आम्हीही शेतकऱ्यांची पोरं आहोत. अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली होती. हाती घेतलेली कामं पूर्ण करण्याचा दबाव आमच्यावर होता, असं अजित पवार म्हणाले.

 

मुश्रीफांच्या मिठीने बरगड्या राहतील का?

धनंजय मुंडे म्हणाले, कोल्हापूरच्या पायताणाची चर्चा झाली. ज्यांना कोल्हापूरच्या पायताणाची ओळखच नाही त्यांनी त्याबद्दल भाषा करावी. हे कोल्हापूर आहे पायताण कसं बनवायचं, ते पायात कसं घालायचं आणि पायातलं काढून योग्य वेळेला चुकल्यावर कुठं वाजवायचं तेही माहिती आहे.'ज्याने कुणी पायताणाची भाषा केली त्याला प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का? पण संस्कारहीन बोलणं सुरु, असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.

WhatsApp channel