मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bill Gates Viral Video: जेव्हा ‘मायक्रोसॉफ्ट’चे मालक बिल गेट्स खिचडीला फोडणी देतात... पाहा व्हिडिओ!

Bill Gates Viral Video: जेव्हा ‘मायक्रोसॉफ्ट’चे मालक बिल गेट्स खिचडीला फोडणी देतात... पाहा व्हिडिओ!

Mar 04, 2023, 12:43 PM IST

  • Watch Video: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बिल गेट्स यांचा खिचडी बनवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Smriti Irani, Bill Gates Viral Video

Watch Video: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बिल गेट्स यांचा खिचडी बनवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

  • Watch Video: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बिल गेट्स यांचा खिचडी बनवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Smriti Irani teaches Bill Gates how to make khichdi: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'पोषणाद्वारे सक्षमीकरण: नव्या भारतातील महिलांचा उत्सव' या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग नोंदवला. या कार्यक्रमातील बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बिल गेट्स यांना खिचडी बनवायची शिकवली. त्यानंतर स्वत: बिल गेट्स यांनी खिचडीला फोडणीदेखील दिली आहे. या दोघांचा व्हिडिओवर अनेकजण कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

दरम्यान, स्मृती इराणी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या बिल गेट्स यांना खिचडी कशी बनवतात? हे शिकवताना दिसत आहेत. त्यानंतर स्वत: बिल गेट्स यांनी खिचडीला फोडणी दिली आहे. व्हिडीओ शेअर करत स्मृती ईराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘भारतातील सुपर फूड… जेव्हा बिल गेट्स यांनी खिचडीला फोडणी दिली…’ सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवर मजेदार कमेंट येत आहेत. काहीजणांनी भारतातील पारंपारिक शाकाहारी अन्नाची ओळख जगाला व्हावी, असे म्हटले आहे. तर, एक जणाने या खिचडीला मायक्रोसॉफ्ट खिचडी म्हणून ओळखले जाईल, अशी कमेंट केली आहे.

विभाग

पुढील बातम्या