मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बापरे, भुतानं चालवला ट्रॅक्टर..? विश्वास बसत नाही, तर हा VIDEO बघा

बापरे, भुतानं चालवला ट्रॅक्टर..? विश्वास बसत नाही, तर हा VIDEO बघा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2023 05:14 PM IST

एक ट्रॅक्टर विना चालक व विना चावी सुरू झाला व बुटांच्या दुकानात शिरला. यामुळे दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले असून दुकानातील लोक पळून गेले.

ट्रॅक्टर घुसला दुकानात
ट्रॅक्टर घुसला दुकानात

सध्या सोशल मीडियावर अनेक गमतीशीर व चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात ज्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक ट्रॅक्टर विना चालक व विना चावी सुरू झाला व बुटांच्या दुकानात शिरला. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हा ट्रॅक्टर शूजच्या दुकानाची काच फोडून आत घुसला. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे. व्हिडिओ पाहून घटनास्थळावरील लोक म्हणू लागले की, या ट्रॅक्टरमध्ये भूत शिरलं की काय..

ट्रॅक्टर विना चावीचा कसा सुरू झाला याचे कारण समोर आले नसले तरी याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. दुकान मालकाच्या तक्रारीनंतर बिजनौर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, किशन कुमार यांनी त्यांचा ट्रॅक्टर चपलांच्या दुकानासमोर उभा केला होता. ट्रॅक्टर तासभर तिथेच उभा राहिला आणि नंतर अचानक सुरू होऊन शोरुममध्ये घुसला. चालकाशिवाय ट्रॅक्टर सुरू झाल्याचे पाहून दुकानातील कर्मचारीही आश्चर्यचकीत झाले व दुकानाबाहेर पळाले. ट्रॅक्टर दुकानात घुसल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना पाहण्यासाठी लोकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

IPL_Entry_Point