मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  "TMC चे गुंड घरोघरी जाऊन पाहतात कोणाची पत्नी सुंदर आहे अन्.. ", स्मृती इराणींचा ममता सरकारवर हल्लाबोल

"TMC चे गुंड घरोघरी जाऊन पाहतात कोणाची पत्नी सुंदर आहे अन्.. ", स्मृती इराणींचा ममता सरकारवर हल्लाबोल

Feb 12, 2024, 08:07 PM IST

  • Smriti Irani On Mamata Banerjee : संदेशखली प्रकरणावरून स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे, त्यांनी म्हटले की, ममता सरकार हिंदुंच्या नरसंहारासाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सरकारने आपल्या पक्षाच्या गुंडांना विवाहित महिलांवर बलात्काराची परवानगीच दिली आहे.

Smriti Irani On Mamata Banerjee

Smriti Irani On Mamata Banerjee : संदेशखली प्रकरणावरून स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे, त्यांनी म्हटले की, ममता सरकार हिंदुंच्या नरसंहारासाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सरकारने आपल्या पक्षाच्या गुंडांना विवाहित महिलांवर बलात्काराची परवानगीच दिली आहे.

  • Smriti Irani On Mamata Banerjee : संदेशखली प्रकरणावरून स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे, त्यांनी म्हटले की, ममता सरकार हिंदुंच्या नरसंहारासाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सरकारने आपल्या पक्षाच्या गुंडांना विवाहित महिलांवर बलात्काराची परवानगीच दिली आहे.

भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी संदेशखली प्रकरणावरून ममता बनर्जी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी आरोप केला की, टीएमसीचे गुंड घरोघरी जाऊन पाहत होते की, कोणाची पत्नी सुंदर आहे. त्यानंतर महिलेची निवड करून तिच्या पतीला म्हणत होते की, या महिलेवर आता आमचा हक्क आहे. ममता बनर्जी सरकार हिंदुंच्या नरसंहारासाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सरकारने आपल्या पक्षाच्या गुंडांना विवाहित महिलांवर बलात्काराची परवानगीच दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Afghanistan floods: अफगाणिस्तानमध्ये पावसाचा कहर, पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू

Attack on Israel : राफावर हल्ल्याआधी इस्लामिक संघटनेने इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र; युद्ध आणखी भडकणार

Viral news: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या जेवणात मिसळत होता प्रायव्हेट पार्ट अन् करत होता लघवी! वेटरचे घाणेरडे कृत्य

Viral news : पाचवीच्या विद्यार्थ्यावर शिक्षिका करत होती बलात्कार! आईने पकडले रंगेहात! काही दिवसात होणार होते लग्न

पश्चिम बंगालमधील संदेशखली येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी लैंगिक छळ आणि अत्याचार केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यावर इराणी यांनी आरोप केला आहे की, टीएमसीचे गुंड मुलींचे अपहरण करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात आणि ममता बॅनर्जी आरोपींवर काहीच कारवाई करत नाहीत.

स्मृती इराणी म्हणाल्या की, टीएमसीचे गुंड प्रत्येक रात्री महिलांचे अपहरण करतात व त्यांच्यावर बलात्कार करतात. संदेशखली येथील महिलांनी माध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यांनी सांगितले की, तृणमूलचे गुंड घरोघरी जाऊन कोणती महिला वयाने लहान आहे, कोणती महिला सुंदर आहे, ते बघतात तिचे अपहरण करतात. त्या महिलांना अनेक दिवस डांबून ठेवतात, त्यांच्यावर अत्याचार करतात. तसेच हे गुंड प्रामुख्याने हिंदू महिलांवर अत्याचार करत असल्याचा आरोपही इराणी यांनी केला आहे. 

काय आहे संदेशखली प्रकरण?

तृणमूल नेते शेख शाहजहान आणि त्याच्या टोळीने लैंगिक छळ केल्याचा आरोप करत संदेशखली येथे महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याबरोबर या नेत्याने जमीन बळकावल्याचा आरोपही करण्यात येत आहे. शाहजहान फरार असून, त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी महिलांनी केली आहे. कथित रेशन घोटाळ्यात त्याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर त्याच्या समर्थकांनी हल्ला केला तेव्हा शाहजहान फरार झाला होता.

महिलांवरील बलात्काराच्या घटनेत टीएमसी नेत्याच्या अटकेची मागणी करत स्थानिक लोकांनी हातात चप्पला घेऊन मोर्चा काढला. या प्रकरणावरून बंगालच्या २४  परगना जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. दरम्यान आरोपी शेख शाहजहान याने सक्तवसुली संचनालय (ईडी) च्या समन्सवर अटकपूर्व जामीनासाठी विशेष सीबीआय कोर्टात धाव घेतली आहे.

पुढील बातम्या