मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kakinada Bus Accident : भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स रिक्षाला धडकली, भीषण अपघातात सहा महिला मृत्यूमुखी

Kakinada Bus Accident : भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स रिक्षाला धडकली, भीषण अपघातात सहा महिला मृत्यूमुखी

May 14, 2023, 07:20 PM IST

    • Kakinada Bus Accident : भरधाव खाजगी ट्रॅव्हल्सने रिक्षाला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Bus Accident In Kakinada Andhra Pradesh

Kakinada Bus Accident : भरधाव खाजगी ट्रॅव्हल्सने रिक्षाला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Kakinada Bus Accident : भरधाव खाजगी ट्रॅव्हल्सने रिक्षाला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bus Accident In Kakinada Andhra Pradesh : भरधाव खाजगी बसने एका रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात सहा कामगार महिलांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील तल्लारेवु बायपास रोडवर हा अपघात झाला आहे. त्यानंतर आता जखमींना तातडीनं उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून बाजूला करण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यामुळं आता आज दुपारी झालेल्या या अपघातामुळं सहा महिलांचा जीव गेल्याने आंध्रप्रदेशात शोक व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

kim jong un : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंगचे घाणेरडे कृत्य! दक्षिण कोरियात पाठवले कचरा आणि मलमूत्रांनी भरलेले फुगे

Exit poll हा तर मानसिक खेळ; तीन दिवसानंतर मोदींची Exit निश्चितः कॉंग्रेस नेत्याचं ट्विट

Lok Sabha Exit Poll: भाजपला किती जागा मिळणार? अरविंद केजरीवाल यांनी वर्तवला अंदाज

योग शिबिरात मृत्यू; प्रेक्षक परफॉर्मन्स समजून वाजवत राहिले टाळ्या अन् वृद्धाचा तडफडून मृत्यू, पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील कामगार महिला तल्लारेवु बायपास मार्गावर रिक्षातून प्रवास करत असताना खाजगी बसने रिक्षाला मागून जोराची धडक दिली. त्यामुळं झालेल्या अपघातात रिक्षा चक्काचुर झाली. त्यातील सहा महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर खाजगी बसमधील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व महिला या झींगा परिसरात काम करायच्या. त्यानंतर आता पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहे.

खाजगी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच कोरंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर आता हा अपघात कसा झाला, त्याचं कारण काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशात एका वाहनाला अपघात झाल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आंध्रप्रदेशातही बसने रिक्षाला धडक दिल्याने सहा महिलांचा मृत्यू झाल्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुढील बातम्या