मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकिस्तानच्या तुरुंगात १७ वर्षे काढली, दिवाळीच्या दिवशी परतला घरी

पाकिस्तानच्या तुरुंगात १७ वर्षे काढली, दिवाळीच्या दिवशी परतला घरी

Oct 25, 2022, 02:59 PM IST

    • पाकिस्तानात पकडले गेल्यानंतर श्यामसुंदरसह सर्व सहकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. इतर पुराव्यांच्या आधारे श्यामसुंदर वगळता इतरांना ६ महिन्यांनी सोडण्यात आलं होतं.
पाकिस्तानच्या तुरुंगात १७ वर्षे काढली, दिवाळीच्या दिवशी परतला घरी

पाकिस्तानात पकडले गेल्यानंतर श्यामसुंदरसह सर्व सहकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. इतर पुराव्यांच्या आधारे श्यामसुंदर वगळता इतरांना ६ महिन्यांनी सोडण्यात आलं होतं.

    • पाकिस्तानात पकडले गेल्यानंतर श्यामसुंदरसह सर्व सहकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. इतर पुराव्यांच्या आधारे श्यामसुंदर वगळता इतरांना ६ महिन्यांनी सोडण्यात आलं होतं.

पाकिस्तानच्या तुरुंगात १७ वर्षे काढल्यानंतर बिहारचा श्यामसुंदर दास दिवाळीच्या दिवशी घरी परतला आहे. त्याच्या आगमनाने कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सुपौल जिल्ह्यातील प्रतापगंज इथं राहणाऱ्या श्यामसुंदरने अनेक वर्षांनी आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. श्यामसुंदर पंजाबमध्ये काम करण्यासाठी गेला होता आणि वाट चुकून सीमेच्या पलिकडे गेला होता. मानसिक स्थिती ठीक नसल्यानं त्याला १७ वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात काढावी लागली.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

श्यामसुंदर २००५ मध्ये त्याच्या काही सहकाऱ्यांसह कामानिमित्त पंजाबला गेला होता. श्यामसुंदर आणि त्याचे इतर पाच साथीदार वाट चुकल्यानंतर पाकिस्तान सीमेच्या हद्दीत गेले होते. पाकिस्तानच्या पोलिसांनी त्यांना कागदपत्रांशिवाय फिरताना पकडलं होतं. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं.

पाकिस्तानात पकडले गेल्यानंतर श्यामसुंदरच्या सर्व सहकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. इतर पुराव्यांच्या आधारे त्यांना ६ महिन्यांनी सोडण्यात आलं होतं. मात्र श्यामसुंदरची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं तो पाकिस्तानी अधिकाऱ्यांना योग्य माहिती देऊ शकला नव्हता. पाकिस्तानकडून भारतीय दुतावासाकडे श्यामसुंदर हा भारतीय असल्याचे पुरावे मागण्यात आले होते. मात्र त्याच्या घरच्यांची आणि कुटुंबियांची योग्य माहिती मिळाली नव्हती.

श्यामसुंदरच्या वडिलांनी सांगितले की, २०२१ मध्ये त्यांना श्यामसुंदर पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी प्रतापगंज पोलिस स्टेशनमध्ये संपर्क करून त्याला भारतात आणण्यासाठी विनंती केली. भगवान दास यांनी श्यामसुंदर भारतीय असल्याचे पुरावे पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी गेल्याच वर्षी ती कागदपत्रे दुतावासाकडे पाठवली.

श्यामसुंदरची ओळख पटवणारी कागदपत्रे मिळाल्यानंतर पाकिस्तान सरकारने २९ सप्टेंबरला त्याला सोडलं. भारतात आल्यानंतर त्याला गुरुनानक देव रुग्णालयात पंजाब पोलिसांच्या देकरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर एसपींच्या आदेशावरून बिहारला एक पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आणि त्यानंतर दिवाळीच्या दिवशी श्यामसुंदरला पंजाबमधून त्याच्या बिहारमधील गावी आणण्यात आले.

पुढील बातम्या