मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Supreme Court Verdict : बहुमत चाचणीचे आदेश बेकायदेशीर, राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

Supreme Court Verdict : बहुमत चाचणीचे आदेश बेकायदेशीर, राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

May 11, 2023, 12:46 PM IST

    • Supreme Court Verdict On Shinde Group MLA Disqualification : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis Today Live (HT_PRINT)

Supreme Court Verdict On Shinde Group MLA Disqualification : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

    • Supreme Court Verdict On Shinde Group MLA Disqualification : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis Today Live : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणांवर आज सुप्रीम कोर्टातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या निर्णयावर सरन्यायाधीशांनी कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहे. याशिवाय नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भारत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळं आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुप्रीम कोर्टाच्या लढाईत उद्धव ठाकरेंचा पराभव झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणांवर निकालाचं वाचन करताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणता आला असता, परंतु एका पत्राच्या आधारावर राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं हे चुकीचं होतं. शिवसेनेतील बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा पाठिंबा काढायचा होता, हे राज्यपालांना मिळालेल्या पत्रात कुठेही नव्हतं, असं म्हणत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले आहे.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही पूर्वस्थिती निर्माण करण्याचे आदेश दिले असते, परंतु त्यांनी राजीनामा दिल्यामुळं आम्ही महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पूर्वस्थितीत आणू शकत नाही, त्यामुळं शिवसेनेतील बंडखोर आमदारांना पात्र अथवा अपात्र करण्याचे अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांनाच असल्याचं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय अपात्रतेच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी 'आम्ही खरी शिवसेना' असा बचाव केला जाऊ शकत नाही, कुठल्याही पक्षातील अंतर्गत गट थेट पक्षावर दावा करू शकत नाही, असं म्हणत शिंदे गटाला फटकारलं आहे.

पुढील बातम्या