मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Robbery In Kongoli : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावात दरोडा; रोख रकमेसह ३० तोळे सोनं लंपास

Robbery In Kongoli : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावात दरोडा; रोख रकमेसह ३० तोळे सोनं लंपास

Jan 09, 2023, 08:38 AM IST

    • Robbery In Kongoli : मध्यरात्री चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून सीमाभागातील पाच घरांमध्ये दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Robbery In Kongoli Villege (HT_PRINT)

Robbery In Kongoli : मध्यरात्री चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून सीमाभागातील पाच घरांमध्ये दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Robbery In Kongoli : मध्यरात्री चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून सीमाभागातील पाच घरांमध्ये दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Robbery In Kongoli Villege : गेल्या काही दिवसांपासून सीमाप्रश्नामुळं राजकीय घडामोडींमुळं चर्चेत आलेल्या कोनगोळीत मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ धातला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत रोख रक्कमेसह तब्बल ३० तोळे सोनं लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी फक्त चोरीच केली नाही तर काही लोकांना बेदम मारहाणही केली आहे. त्यामुळं आता कोनगोळीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

EPFO ने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया केली अधिक सुलभ! नॉमिनीला आधार तपशीलाशिवायही मिळणार PF रक्कम

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कोनगोळीत मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास दरोडेखोरांच्या दहा जणांच्या टोळक्यानं पाच घरांमध्ये चोरी केली. रोख रक्कम आणि सोन्याची चोरी करताना दरोडेखोरांनी शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यासह त्यांच्या तरुण मुलीलाही मारहाण केली आहे. याशिवाय दुसऱ्या एका घरातील वृद्ध महिलेच्या लाकडी दांड्यानं चोरट्यांनी मारहाण केली आहे. त्यामुळं या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. चोरट्यांनी पाच घरातून रोख रकमेसह तब्बल ३० तोळे सोनं लंपास केलं असून चोरीच्या घटनेनंतर शहरातील नागरिकांनी रात्र जागून काढली आहे.

कोनगोळीत दरोडा पडल्याची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली आहे. ज्या मार्गानं चोरटे कोनगोळीत शिरले होते, त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज चेक केलं जात असून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. याशिवाय ज्या लोकांच्या घरात चोरी झाली त्यांनी काही चोरट्यांचे चेहरे पाहिलेले असल्यानं पोलिसांनी त्यांचीही विचारपूस करत चोरट्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पुढील बातम्या