मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  massive protests in China : कोरोना टाळेबंदी विरोधात चीनमध्ये जनक्षोभ; पोलिसांच्या कारवाईत १० ठार

massive protests in China : कोरोना टाळेबंदी विरोधात चीनमध्ये जनक्षोभ; पोलिसांच्या कारवाईत १० ठार

Nov 28, 2022, 08:36 AM IST

    • China’s ‘Zero-Covid policy’ draws to massive protests across nation : करोनाच्या ताज्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या कठोर टाळेबंदीविरोधात चीनमध्ये जनक्षोभ उसळला असून रविवारी अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाबद्दल हजारो नागरिकांनी घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली. आंदोलनाचे हे लोण राजधानी बीजिंग आणि नानजिंग शहरांतील विद्यापीठांच्याही परिसरात पोहोचले आहे.
बीजिंगमधील त्सिंगहुआ विद्यापीठात रविवारी शनिवारी चीनच्या जिआंगसू प्रांतातील नानजिंगमधील कम्युनिकेशन युनिव्हर्सिटी ऑफ चायना येथे लोकांनी सरकारच्या झीरो कोविड पॉलिसीच्या निषेध करत रस्त्यांवर उतरत निषेध केला. (रॉयटर्स)

China’s ‘Zero-Covid policy’ draws to massive protests across nation : करोनाच्या ताज्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या कठोर टाळेबंदीविरोधात चीनमध्ये जनक्षोभ उसळला असून रविवारी अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाबद्दल हजारो नागरिकांनी घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली. आंदोलनाचे हे लोण राजधानी बीजिंग आणि नानजिंग शहरांतील विद्यापीठांच्याही परिसरात पोहोचले आहे.

    • China’s ‘Zero-Covid policy’ draws to massive protests across nation : करोनाच्या ताज्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या कठोर टाळेबंदीविरोधात चीनमध्ये जनक्षोभ उसळला असून रविवारी अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाबद्दल हजारो नागरिकांनी घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली. आंदोलनाचे हे लोण राजधानी बीजिंग आणि नानजिंग शहरांतील विद्यापीठांच्याही परिसरात पोहोचले आहे.

बीजिंग : चीनमधील 'झिरो-कोविड पॉलिसी'च्या विरोधात चीनमधील नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. चीनमध्ये लावलेले लॉकडाउन, सक्तीचे विलगीकरण, सामूहिक चाचणी मोहिमा याला नगिरीक कंटाळले आहेत. "शी जिनपिंग, पायउतार हो! सीसीपी, स्टेप डाउन!" अशा घोषणा देत बीजिंग आणि शांघायमध्ये रविवारी सरकारविरोधात जनक्षोभ उफाळला. चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाविरोधात अशा प्रकारचे आंदोलन होणे म्हणजे मोठी घटना समजली जात आहेत. या आंदोलनात पोलिसांच्या कारवाईत आता पर्यन्त १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

पोलादी भिंत असलेल्या चीनमध्ये सरकारच्या विरोधात नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. कठोर कोरोना नियमावलीला नागरिक कंटाळले आहेत. शांघायमध्ये हजारो निदर्शक सरकारविरोधी घोषणा देत आहेत. तियानमेन चौकातील आंदोलनानंतर आतापर्यन्त सरकारविरोधी झालेले हे सर्वात मोठे आंदोलन समजले जात आहे. शेकडो चीनी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ३३ वर्षांपूर्वी तियानमेन चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात चीनी लष्कराने आंदोलकांवर रणगाडे चालवले होते. कोरोना विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुन्हा आता तियानमेन चौकात झालेल्या आंदोलनाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

क्षिनजियांग प्रांताची राजधानी उरुमकी या शहरात शनिवारच्या तीव्र निदर्शनानंतर रविवारीही नागरिक मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सरकारविरोधी घोषणा या सुरच ठेवल्या. याच शहरात गुरुवारी एका करोना प्रतिबंधित संकुलाला आग लागून दहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून तेथील परिस्थिती संवेदनशील बनली आहे. आंदोलक ‘अध्यक्ष जिनपिंग, स्टेप डाऊन’ आणि ‘कम्युनिस्ट पार्टी, अशा घोषणा देत आहेत. चीनमध्ये रविवारी तब्बल ३९,५०६ देशांतर्गत कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, जी सर्वात मोठी आहे.

आंदोलनाचे लोन हे बीजिंगमधील त्सिंगहुआ विद्यापीठात देखील पोहचले आहेत. रविवारी शनिवारी चीनच्या जिआंगसू प्रांतातील नानजिंगमधील कम्युनिकेशन युनिव्हर्सिटी ऑफ चायना येथे लोकांनी सरकारच्या झीरो कोविड पॉलिसीच्या निषेध करत रस्त्यांवर उतरत निषेध केला. चीनच्या शून्य-कोविड धोरणाविरुद्ध ‘कोरी पत्रके’ वापरून सरकारी धोरणांचा निषेध करत विद्यार्थ्यांनी सरकारविरोधी मोठ्या घोषणा यावेळी दिल्या.

शिनजियांग प्रदेशाची राजधानी उरुमकी येथे अग्नितांडव झाले होते. या घटनेच्या आदल्या रात्री या परिसरात सरकारविरोधी निदर्शने झाली. दरम्यान, ही आग नियंत्रणात आणत असताना कोरोना प्रतिबंधामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला.

वरवर टाळेबंदीविरोधी वाटणाऱ्या या आंदोलनाने राजकीय वळण घेतले आहे. चीनमध्ये गेल्या काही वर्षांत प्रथमच नागरिक सरकारविरोधी रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारची करोना प्रतिबंधक धोरणे अपयशी ठरल्याने आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्था मंदावण्यावर झाल्याने नागरिकांमध्ये खदखदणारा संताप व्यक्त झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

दरम्यान, चीन मधील आंदोलनाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चीनी सरकार हे आंदोलन दडपण्यासाठी दडपक्षाहीचा वापर करत आहेत. त्यामुळे नगरिकांचा रोष हा पुन्हा वाढत आहे.

 

विभाग

पुढील बातम्या