मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून पोलिसांची पत्नी व मुलीसह १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून पोलिसांची पत्नी व मुलीसह १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Sep 07, 2022, 04:46 PM IST

    • Police constable Suicide with family: पोलिस हवालदाराने अडीच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याआधी हवालदाराने त्याच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना एक मोठा मेसेजही पाठवला होता.
गुजरातमध्ये पोलिस हवालदाराची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

Police constable Suicide with family: पोलिस हवालदाराने अडीच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याआधी हवालदाराने त्याच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना एक मोठा मेसेजही पाठवला होता.

    • Police constable Suicide with family: पोलिस हवालदाराने अडीच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याआधी हवालदाराने त्याच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना एक मोठा मेसेजही पाठवला होता.

Police constable Suicide with family: इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून एका पोलिस हवालदाराने पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केली आहे. अहमदाबादमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस निरीक्षक एनआर वाघोला यांनी दिलेल्या माहितीनुसार दीड वाजता आत्महत्येची घटना घडली. मृतांची ओळख पटली असून वस्त्रापूर पोलिस ठाण्यात तैनात असलेले हवालदार कुलदीप सिंह यादव, त्यांची पत्नी रिद्धी आणि अडीच वर्षांची मुलगी सोला अशी त्यांची नावे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

सोसायटीतील लोकांनी सांगितले की, आधी हवालदाराची पत्नी रिद्धीने उडी मारली, त्यानंतर कुलदीपने मुलीसह १२ व्या मजल्यावरून उडी मारली. खाली पडण्यामध्ये दहा सेकंदाचं अंतर असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच त्यांना कुणी धक्का मारला नसल्याचं एफएसएलच्या रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं दिसून येतंय. सद्या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, हवालदाराने आपल्या मोबाईलनंबर वरून मित्रांना आणि सहकाऱ्यांना व्हॉटसअॅपवर एक मोठा मेसेज पाठवला होता. त्यात कुलदीपने आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबतच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. या मेसेजशिवाय इतर कोणतीही सुसाइड नोट कुलदीपने लिहिल्याचं आढळून आलेलं नाही. तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले असून त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पोलिस निरीक्षक वाघेला यांनी सांगितले की, मृत व्यक्तीच्या फोन डिटेल्सची चौकशी करणं अद्याप बाकी आहे. कोणती सुसाइड नोट पाठवली होती की नव्हती हे त्यानंतरच समजेल. शेवटी कुलदीपने मेसेजमध्ये म्हटलं होतं की, हे पाहून आनंद होतोय की त्याच्या सहकाऱ्यांना ग्रेड पेचा फायदा मिळतो. जवळपास तीन आठवड्यांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या मुद्द्यावर झालेल्या विरोधानंतर राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढीसाठी ५५० कोटी रुपयांच्या वार्षिक निधीला मंजुरी दिली होती.

विभाग

पुढील बातम्या