मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sandeep Lamichhane: क्रिकेटर संदीप लामिछानेवर बलात्काराचा गुन्हा दाखल, १७ वर्षीय मुलीची तक्रार

Sandeep Lamichhane: क्रिकेटर संदीप लामिछानेवर बलात्काराचा गुन्हा दाखल, १७ वर्षीय मुलीची तक्रार

Sep 07, 2022, 02:45 PM IST

    • Sandeep Lamichhane Alleged Rape Complaint: नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने संदीपवर हे आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Sandeep Lamichhane

Sandeep Lamichhane Alleged Rape Complaint: नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने संदीपवर हे आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    • Sandeep Lamichhane Alleged Rape Complaint: नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने संदीपवर हे आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. नेपाळ पोलिसांनी सांगितले की, एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने संदीपवर हे आरोप केले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संदीप लामिछाने आयपीएलमध्येही सहभागी झाला आहे. तो येणाऱ्या काळातील क्रिकेटच्या दुनियेतील स्टार खेळाडू मानला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप सध्या नेपाळ संघाचे प्रतिनिधित्व करताना केनियामध्ये क्रिकेट खेळत आहे.

संदीप लामिछानेला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले होते

संदीप हा लेगस्पिनर आहे. २०१६ च्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. नेपाळचा संघ त्या स्पर्धेत आठव्या स्थानावर राहिला होता. यानंतर त्याला २०१८ मध्ये आयपीएलचा करार मिळाला. लिलावात दिल्ली कॅपिटल्सने संदीपला विकत घेतले. आयपीएल करार मिळवणारा तो नेपाळचा पहिला क्रिकेटपटू ठरला. दिल्लीने संदीपला त्याच्या मूळ (बेस प्राईज) किंमतीत २० लाखात विकत घेतले होते.

संदीप लामिछानेचं क्रिकेट करिअर

याशिवाय संदीप बिग बॅश लीगमध्येही खेळला आहे. तो जगभरातील क्रिकेट लीगचा एक महत्त्वाचा भाग आहे. संदीपने नेपाळकडून आतापर्यंत ३० एकदिवसीय आणि ४४ टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ६९ आणि ४४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८५ बळी आहेत. याशिवाय संदीपने आयपीएलमध्ये ९ सामने खेळले असून १३ विकेट्स घेतल्या आहेत.

तर संदीपने जगभरातील लीगमध्ये एकूण १३६ टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १९३ विकेट्स घेतल्या आहेत. संदीपच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन आणि लिस्ट-ए मध्ये ११५ विकेट्स आहेत.

पुढील बातम्या