मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकिस्तानमध्ये लवकरच रेल्वे सेवा पूर्णपणे होणार ठप्प? पाक रेल्वेने सांगितले ‘हे’ कारण

पाकिस्तानमध्ये लवकरच रेल्वे सेवा पूर्णपणे होणार ठप्प? पाक रेल्वेने सांगितले ‘हे’ कारण

Jan 02, 2023, 05:41 PM IST

  • पाकिस्तानकडे सध्या तीन दिवस पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक असल्याने देशभरातील प्रवासी वाहतूक व मालवाहूतक रेल्वे सेवा लवकरच ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तान रेल्वे

पाकिस्तानकडे सध्या तीन दिवस पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक असल्याने देशभरातील प्रवासी वाहतूक व मालवाहूतक रेल्वे सेवा लवकरच ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • पाकिस्तानकडे सध्या तीन दिवस पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक असल्याने देशभरातील प्रवासी वाहतूक व मालवाहूतक रेल्वे सेवा लवकरच ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तान सतत आर्थिक संकटात अडकत आहे. ताजी बातमी पाकिस्तान रेल्वेची आहे, ज्यांच्याकडे ट्रेन चालवण्यासाठी फक्त तीन दिवस पुरेल इतकाच तेल साठा शिल्लक आहे.अशा परिस्थितीत त्याच्या प्रवासी गाड्या आणि मालगाड्यांची चाके केव्हाही थांबू शकतात.डॉन वृत्तपत्राने पाकिस्तान रेल्वेच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.या अधिकाऱ्याने सांगितले की, एवढा कमी साठा असल्याने पाकिस्तान रेल्वेची स्थिती किती वाईट झाली आहे हे दिसून येते. रेल्वे विभागाने पाकिस्तानचे रेल्वे मंत्री ख्वाजा साद रफिक यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि समस्या लवकरा लवकर सोडवण्याची विनंती केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

..तर रेल्वे दिवाळखोरीत निघेल -
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान रेल्वेकडे फक्त एक दिवसाचा तेलाचा साठा शिल्लक होता.डॉनच्या वृत्तानुसार,यामुळे अनेक मालगाड्या थांबवाव्या लागल्या.रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कराची आणि लाहोरमध्ये अनेक मालगाड्या थांबवाव्या लागल्या. पाकिस्तानी रेल्वेच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.सरकारने योग्य लक्ष न दिल्यास येथील रेल्वे लवकरच दिवाळखोरीत निघेल, असेही ते म्हणाले.त्याचबरोबर योग्य निर्णय न घेतल्याने रेल्वेच्या अनेक मालमत्तांचाही योग्य वापर होत नाही. याचे कारण येथील राजकीय अस्थिरता आणि राजकीय पक्षांची अवस्था असल्याचे सांगितले जात आहे.

पगार, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीही देण्यास असमर्थ -
पाकिस्तान रेल्वेच्या अधिकाऱ्याने आणखी एक धक्कादायक माहिती दिली. त्यानुसार, सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देण्यासाठी रेल्वेकडे पुरेसे पैसे नाहीत. या अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानमधील रेल्वे विभाग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. डॉनच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आणि सेवानिवृत्त लोकांना पेन्शन देण्यासाठी विभागाकडे पैसे नाहीत, अशी स्थिती आहे. ज्यांना महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार मिळायला हवा, त्यांना १५ ते २० दिवस उशीर होत आहे.

पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन -

पाकिस्तान रेल्वेच्या चालकांना २० डिसेंबरपर्यंत पगार मिळाला नाही. यामुळे चालकांनी रेल्वे थांबवून संप आणि देशभरात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर त्यांचा पगार दोन हप्त्यांमध्ये देण्यात आला. यानंतर त्यांनी आंदोलनाचा निर्णय मागे घेतला. पाकिस्तान रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तुम्ही परिस्थितीचा सहज अंदाज लावू शकता. २०१७-१८आणि त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात विभागाची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. त्यावेळी मालवाहतुकीतून रेल्वेचे वार्षिक उत्पन्न दोन अब्जांच्या वर पोहोचले होते.

विभाग

पुढील बातम्या