मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मुस्लिम महिलेचा हिजाब फाडला; डोक्यावर घाव घालत केली वंशवादी टिप्पणी, गुन्हा दाखल

मुस्लिम महिलेचा हिजाब फाडला; डोक्यावर घाव घालत केली वंशवादी टिप्पणी, गुन्हा दाखल

Jul 13, 2022, 09:27 AM IST

    • Hijab Controversy : याआधी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये मुस्लिम महिलांवर सार्वजनिक ठिकाणी वंशवादी टिप्पणी करण्याच्या घटना घडली होती. त्यानंतर आता हे प्रकरण वाढत असल्याचं चित्र आहे.
Hijab Controversy In Germany (HT)

Hijab Controversy : याआधी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये मुस्लिम महिलांवर सार्वजनिक ठिकाणी वंशवादी टिप्पणी करण्याच्या घटना घडली होती. त्यानंतर आता हे प्रकरण वाढत असल्याचं चित्र आहे.

    • Hijab Controversy : याआधी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये मुस्लिम महिलांवर सार्वजनिक ठिकाणी वंशवादी टिप्पणी करण्याच्या घटना घडली होती. त्यानंतर आता हे प्रकरण वाढत असल्याचं चित्र आहे.

Hijab Controversy In Germany : नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या युरोपिय राष्ट्रांमध्ये सर्वात पुढे असणाऱ्या जर्मनीत मुस्लिम महिलेचा हिजाब फाडत तिच्यावर वंशवादी टिप्पणी केल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच बर्लिनमध्ये असाच एक प्रकार घडला होता, त्यानंतर आता ही घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

समोर आलेली घटना ही जर्मनीची राजधानी बर्लिनमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका हॉटेलमध्ये हिजाब घातलेल्या महिलेवर हल्ला करण्यात आला, हल्लेखोरानं महिलेच्या डोक्यावर वार करत हिजाब फाडला, त्यात महिलेली किरकोळ मार लागला असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी प्रसंगावधान राखत केलेल्या मदतीमुळं महिलेला जास्त मार लागला नाही.

जर्मनीत मुस्लिम महिलांवर धर्मभेदी किंवा वंशवादी टिप्पणी करण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच बर्लिनमध्ये एका मुस्लिम महिलेवर वंशवादी टिप्पणी करण्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर संबंधित आरोपीला पोलिसांनी अटकसुद्धा केली होती. आता या घटनेनंतरही बर्लिन पोलिसांनी हल्लेखोराला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुढील बातम्या