मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujrat Riots Case : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना गुजरात पोलिसांकडून अटक!

Gujrat Riots Case : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना गुजरात पोलिसांकडून अटक!

Jul 13, 2022, 08:58 AM IST

    • Gujrat Riots Case : गुजरात दंगलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ६३ जणांना गुजरातच्या विशेष तपास पथकानं क्लिन चिट दिली होती. झाकिया जाफरींच्याही याचिकेनंतरही न्यायालयानं हाच निकाल कायम ठेवला. त्यानंतर आता अटकसत्र सुरू असल्याचं बोललं जात आहे.
Gujarat Police Arrested Former IPS Sanjiv Bhatt (HT)

Gujrat Riots Case : गुजरात दंगलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ६३ जणांना गुजरातच्या विशेष तपास पथकानं क्लिन चिट दिली होती. झाकिया जाफरींच्याही याचिकेनंतरही न्यायालयानं हाच निकाल कायम ठेवला. त्यानंतर आता अटकसत्र सुरू असल्याचं बोललं जात आहे.

    • Gujrat Riots Case : गुजरात दंगलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ६३ जणांना गुजरातच्या विशेष तपास पथकानं क्लिन चिट दिली होती. झाकिया जाफरींच्याही याचिकेनंतरही न्यायालयानं हाच निकाल कायम ठेवला. त्यानंतर आता अटकसत्र सुरू असल्याचं बोललं जात आहे.

Gujarat Police Arrested Former IPS Sanjiv Bhatt : न्यायालयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ६३ जणांना गुजरात दंगली प्रकरणी क्लिन चिट दिल्यानंतर आता गुजरातमध्ये अटकांचे सत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरात पोलिसांनी मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर आता गुजरातच्या विशेष तपास पथकानं काल रात्री उशिरा अहमदाबादेतून माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना ताब्यात घेतलं आहे. मागील बऱ्याच काळापासून भट्ट हे पालनपूर तुरुंगात अटकेत आहे. त्यामुळं आता अहमदाबाद पोलिसांच्या कारवाईनंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

पालनपूर तुरुंगामध्ये भट्ट यांना अटक करण्यासंदर्भातील कागदोपत्री कारवाई पूर्ण केल्यानंतर अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तुकडीनं त्यांना अटक करून अहमदाबादमध्ये आणलं. त्यामुळं आता भट्ट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ट्रान्सफर वॉरंट अंतर्गत भट्ट यांच्यावर कारवाई केल्याची माहिती आहे. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीप्रकरणी निर्दोष लोकांना अडकावण्याचा प्रयत्न केला म्हणून ही अटक झाल्याचं सांगितलं जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

गोध्रा जळींतकांडानंतर २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगल उसळली होती. त्यात अहमदाबादेतील गुलबर्ग सोसायटीतील काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह ६९ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात विशेष तपास पथक म्हणजेच एसआटीनं पंतप्रधान मोदी यांच्यासह ६३ जणांना क्लीन चिट दिली होती. परंतु या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी याचिका एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी न्यायालयात दाखल केली होती. परंतु कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावत गुजरात एसआटीनं दिलेला निकाल कायम ठेवला.

मोदींना न्यायालयानं दिलेल्या क्लिन चिटनंतर गुजरात एटीएसनं तिस्ता सेटलवाड यांना त्यांच्या मुंबईतील राहत्या घरातून ताब्यात घेतलं होतं. याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सेटलवाड यांचं नाव घेतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असं देखील सांगितलं गेलं.

एसआयटीनं कुणावर केले गुन्हे दाखल?

पोलिसांनी या प्रकरणात तिस्ता सेटलवाड यांच्याशिवाय माजी आयपीएस अधिकारी आर. बी. श्रीकुमार आणि आता संजीव भट्ट यांना अटक केली आहे. त्यांच्यावर दंगलींबाबत चुकीची माहिती दिल्याचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

पुढील बातम्या