मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  माता न तू वैरिणी ! तीन महिन्यांच्या चिमुकलीला आईने तिसऱ्या मजल्यावरून फेकले, काय आहे कारण?

माता न तू वैरिणी ! तीन महिन्यांच्या चिमुकलीला आईने तिसऱ्या मजल्यावरून फेकले, काय आहे कारण?

Jan 02, 2023, 06:50 PM IST

  • मुलगी सतत आजारी असते तिच्या वेदना पाहवत नाहीत म्हणून एका आईने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यात चिमुकलीचा मृत्यू झाला असून आरोपी आईला अटक केली आहे.

तीन महिन्यांच्या चिमुकलीला आईने तिसऱ्या मजल्यावरून फेकले

मुलगी सतत आजारी असते तिच्या वेदना पाहवत नाहीत म्हणून एका आईने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यात चिमुकलीचा मृत्यू झाला असून आरोपी आईला अटक केली आहे.

  • मुलगी सतत आजारी असते तिच्या वेदना पाहवत नाहीत म्हणून एका आईने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यात चिमुकलीचा मृत्यू झाला असून आरोपी आईला अटक केली आहे.

माता आपल्या मुलांना आपल्या जीवापेक्षाही जास्त जपतात. पण गुजरातमधून अशी बातमी समोर आली आहे ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. एका आईने आपल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीला हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झाला.२३वर्षीय आईला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना नववर्षाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे १ जानेवारीची आहे. गुजरातमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

पोलिसांनी सांगितले की,मुलीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकणारी महिला ही आणंदमधील पेटलाड येथील रहिवासी आहे. फरझानबानू मालेक असे या महिलेचे नाव आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की तिची तीन महिन्यांची मुलगी अमरीनबानू जन्मापासूनच आजारी होती. ती खूप आजारी असायची. मी तिला दुःखात पाहू शकत नव्हतो. त्यामुळेच मी हे पाऊल उचलले. आईच्या या निर्दयतेची कहाणी ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,तीन महिन्यांच्या मुलीला दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलीच्या आईने सुरुवातीला दावा केला होता की, तिचे मूल रुग्णालयातून बेपत्ता झाले आहे. यानंतर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. फुटेजमध्ये ती आपल्या मुलीसोबत गॅलरीत फिरताना आणि नंतर रिकाम्या हाताने परत येताना दिसत आहे. यानंतर पोलिसांना आईवर संशय आला. चौकशीत तिने तिचा गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी सांगितले की, एफआयआरनुसार मुलगी जन्माला आल्यानंतर आजारी पडली. वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलीचे वडील आसिफ यांनी सांगितले की, रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, मुलगी अशुद्ध पाणी पिल्याने आजारी पडली आहे.

या तीन वर्षांच्या मुलीला १४ डिसेंबर रोजी नडियाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १जानेवारी रोजी मुलीच्या आईने ती बेपत्ता असल्याचा दावा केला. यानंतर मुलीच्या वडिलांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मुलीचा मृतदेह तळमजल्यावर आढळून आला. पोलिसांना माहिती देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता समोर आलेल्या सत्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. आईनेच आपल्या मुलाला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले होते. आईने गुन्ह्याची कबुली दिली असून माझ्या मुलीला खूप वेदना होत असल्याचे तिने सांगितले. तिचे दुखणे मला पाहवत नव्हते म्हणून मी हे पाऊल उचलले.

 

विभाग

पुढील बातम्या