मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हिंदू महासभेचा वादग्रस्त देखावा, महात्मा गांधीजींना दाखवलं राक्षस रुपात

हिंदू महासभेचा वादग्रस्त देखावा, महात्मा गांधीजींना दाखवलं राक्षस रुपात

Oct 03, 2022, 11:54 AM IST

    • Hindu Mahasabha on Mahatma Gandhi: दुर्गा पुजेत महात्मा गांधी यांच्यासारखा दिसणारा राक्षसाचा पुतळा देखाव्यात ठेवण्यात आला आहे.
हिंदू महासभेचा वादग्रस्त देखावा, महात्मा गांधीजींना दाखवलं राक्षस रुपात

Hindu Mahasabha on Mahatma Gandhi: दुर्गा पुजेत महात्मा गांधी यांच्यासारखा दिसणारा राक्षसाचा पुतळा देखाव्यात ठेवण्यात आला आहे.

    • Hindu Mahasabha on Mahatma Gandhi: दुर्गा पुजेत महात्मा गांधी यांच्यासारखा दिसणारा राक्षसाचा पुतळा देखाव्यात ठेवण्यात आला आहे.

Hindu Mahasabha on Mahatma Gandhi: अखिल भारतीय हिंदू महासभेने केलेल्या एका देखाव्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. दुर्गा पुजेत महात्मा गांधी यांच्यासारखा दिसणारा राक्षसाचा पुतळा देखाव्यात ठेवण्यात आला आहे. यात राक्षसाच्या रुपात एक धोतर नेसलेला आणि हातात काठी असलेला हा गांधीजींसारखा पुतळा आहे. या पुतळ्याचे आणि महात्मा गांधी यांच्यात साम्य हा योगायोग असल्याचं आयोजकांनी म्हटलंय. तर दुसरीकडे स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांच्या भूमिकेवर टीका करणं गरजेचं असल्याचंही आयोजक म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यातील हिंदू महासभेच्या या देखाव्यावर राज्यातील सत्ताधारी टीएमसीसह भाजप, सीपीआयएम, काँग्रेस इत्यादी पक्षांनी टीका केलीय. तर हिंदू महासभेनं यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "टक्कल पडलेली आणि चष्मा घातलेली व्यक्ती गांधीच असण्याची गरज नाहीय. या देखाव्यात असणाऱ्या राक्षसाच्या पुतळ्याच्या हातात ढाल आहे. गांधीजींकडे कधीच ढाल नव्हती. आम्ही आमच्या देखाव्यात दुर्गा देवीने वध केलेला राक्षस दाखवला आहे. तो राक्षस गांधीजींसारखा दिसणे हा निव्वळ योगायोग आहे."

तृणमूल काँग्रेसचे महासचिव कुणाल घोष यांनी या देखाव्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. त्यात म्हटलं की, भाजपचा हा खरा चेहरा आहे. बाकी जे भाजप करते ते नाटक आहे. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. गांधीजी आणि त्यांच्या विचारधारेचा आदर जगाकडून कऱण्यात येतो. त्यांचा अशाप्रकारे अपमान सहन केला जाऊ शकत नाही. आम्ही याचा जाहीर निषेध करतो.

सीपीआयएमचे केंद्रीय समितीचे सदस्य समिक लहिरी यांनी म्हटलं की, "भाजप आणि संघाला फक्त भारताचे विभाजन कसं करायचं हेच कळतं, ब्रिटिशविरोधी शक्तींना ते असुर म्हणतात तर दुर्गामातेला ब्रिटिश." भाजप नेत्यांनीही यावर पक्षाची बाजू स्पष्ट केली. आम्ही अशा गोष्टींना पाठिंबा देत नाही. हे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. प्रशासनाने आयोजकांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप प्रवक्ते समीक भट्टाचार्य यांनी केली.

विभाग

पुढील बातम्या