मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 03 October Live: वैद्यक क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर; स्वंते पाबो यांचा गौरव
svante paabo (AFP)

Marathi News 03 October Live: वैद्यक क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर; स्वंते पाबो यांचा गौरव

Oct 03, 2022, 04:00 PMIST

Marathi News Live Updates: वैद्यक क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जाणारा २०२२ चा नोबेल पुरस्कार स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो यांना जाहीर झाला आहे.

Oct 03, 2022, 03:14 PMIST

Mulayam Singh Yadav: मुलायम सिंह यांची प्रकृती आणखी बिघडली, CCU मध्ये दाखल

समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती आणखी बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना क्रिटिकल केअर युनिटमध्ये दाखल केलं आहे. मेदांता रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून मुलायम सिंह यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Oct 03, 2022, 02:25 PMIST

MNS: मनसेच्या टेलिकॉम सेनेची कार्यकारिणी बरखास्त

महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांचं पद वगळता या संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाईल, असं मनसेनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.

Oct 03, 2022, 01:52 PMIST

Ramesh Josh Death: समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते रमेश जोशी यांचं निधन

समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते रमेश जोशी यांचं आज दुपारी १२.३० वाजता निधन झालं. पत्रकार साहिल जोशी यांचे ते वडील होत.

Oct 03, 2022, 12:30 PMIST

andheri east bypoll: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळं रिक्त झालेली अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीचं मतदान ३ नोव्हेंबर रोजी होणार असून ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे.

Oct 03, 2022, 11:20 AMIST

Sonia Gandhi: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सुद्धा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा लवकरच कर्नाटकात दाखल होणार असून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या देखील यात्रेत सहभागी होणार आहेत. येत्या ६ ऑक्टोबर रोजी त्या यात्रेत सहभागी होतील. ‘भारत जोडो’ यात्रा कर्नाटकात २१ दिवस चालणार असून ५११ किलोमीटरचं अंतर कापणार आहे.

Oct 03, 2022, 09:51 AMIST

Stock Market: शेअर बाजारानं फडकावलं लाल निशाण

मागील काही दिवसांपासून सातत्यानं गटांगळ्या खाणाऱ्या शेअर बाजारानं आज, आठवड्याच्या पहिल्या दिवशी लाल निशाण फडकावलं आहे. सेन्सेक्स २०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला असून निफ्टीही ५० अंकांनी पडून ट्रेड करत आहे.

Oct 03, 2022, 09:13 AMIST

पंतप्रधान मोदींनी केली मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे वडील आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आवश्यक ती सर्व मदत करू असंही पंतप्रधान मोदींनी अखिलेश यादव यांना सांगितल्याचं म्हटलं जात आहे.

Oct 03, 2022, 08:32 AMIST

पंजाबी गायक अल्फाज याला गाडीने दिली धडक, रुग्णालयात उपचार सुरू

पंजाबी गायक अल्फाज याला भरधाव वाहनाने धडक दिली असून यात तो जखमी झाला आहे. एका धाब्याबाहेर उभा राहिला असताना त्याला गाडीने धडक दिली. यात जखमी झालेल्या अल्फाज याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. तर विकी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय.

Oct 03, 2022, 07:37 AMIST

नवरात्रीनिमित्त घातलेल्या मंडपाला आग, ६४ जण होरपळले, दोघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बदोही इथं नवरात्रीनिमित्त घालण्यात आलेल्या मंडपाला आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. या आगीत ६४ जण होरपळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    शेअर करा