मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  केएफसी अयोध्येत आऊटलेट उघडणार! पण त्या आधी मान्य करावी लागणार योगी सरकारीची 'ही' अट

केएफसी अयोध्येत आऊटलेट उघडणार! पण त्या आधी मान्य करावी लागणार योगी सरकारीची 'ही' अट

Feb 08, 2024, 11:41 AM IST

    • KFC outlet In Ayodhya : अयोध्या येथील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडल्यावर मोठ्या प्रमाणात भाविक राम मंदिराला भेटी देत आहेत. या ठिकाणी खाद्य पदार्थाचे आंतरराष्ट्रीय ब्रँड देखील त्यांचे शॉप सुरू करण्यास उत्सुक आहेत.
KFC outlet In Ayodhya

KFC outlet In Ayodhya : अयोध्या येथील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडल्यावर मोठ्या प्रमाणात भाविक राम मंदिराला भेटी देत आहेत. या ठिकाणी खाद्य पदार्थाचे आंतरराष्ट्रीय ब्रँड देखील त्यांचे शॉप सुरू करण्यास उत्सुक आहेत.

    • KFC outlet In Ayodhya : अयोध्या येथील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडल्यावर मोठ्या प्रमाणात भाविक राम मंदिराला भेटी देत आहेत. या ठिकाणी खाद्य पदार्थाचे आंतरराष्ट्रीय ब्रँड देखील त्यांचे शॉप सुरू करण्यास उत्सुक आहेत.

KFC outlet In Ayodhya : अयोध्या येथील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडल्यावर मोठ्या प्रमाणात भाविक राम मंदिरात दर्शनासतही येत आहेत. अयोध्येत खाद्य पदार्थाचे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड त्यांचे शॉप सुरू करण्यास उत्सुक आहेत. अशीच एक अमेरिकन फूड चेन कंपनी KFC म्हणजेच केंटकी फ्राइड चिकन लवकरच अयोध्येत त्यांचे आऊटलेट सुरू करण्याच्या विचारात आहे. या बाबत कंपनीने अधिकृत घोषणा केली नसून योगी सरकार सोबत त्यांची चर्चा सुरू असल्याचे समजते. अयोध्येत मांसाहारी पदार्थ विकण्यास बंदी आहे. त्यामुळे ही अट मान्य करून अयोध्येत केएफसी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे अयोध्येत डॉमिनोजने त्यांचे आऊटलेट सुरू केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

मंत्रालयाच्या आवारात फोटोसेशन, रिल्स बनवणं महागात पडणार, थेट कारवाई होणार

अयोध्येतील पंचकोसी मार्गावर मांस किंवा मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तब्बल १५ किमीचा हा मार्ग तीर्थदर्शन पंच कोसी परिक्रमेशी जोडलेला आहे. मनी कंट्रोलशी बोलताना, अयोध्येतील सरकारी अधिकारी विशाल सिंह म्हणाले, 'केएफसीने अयोध्या-लखनऊ हायवेवर युनिट सुरू केले आहे. अयोध्येत मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. 'केएफसीने फक्त शाकाहारी पदार्थ विक्री करण्याचे ठरवले तर आम्ही त्यांना आऊटलेट उघडण्याची परवानगी देऊ. 'अनेक मोठ्या फूड चेन आउटलेटने आम्हाला अयोध्येत दुकाने सुरू करण्यासंदर्भात परवानगी मागीतल्या आहेत. आम्ही त्यांचे या ठिकाणी स्वागत करून, पण फक्त पंचकोशीत मांसाहारी पदार्थ विक्रीवर बंदी राहील. आमच्या अटी त्यांना मान्य असतील तर ते दुकाने सुरू करू शकतात.

Whatsapp News : व्हॉट्सॲपवरून आता कोणत्याही ॲपवर पाठवता येणार मेसेज! चॅटिंगची पद्धत बदलणार

अयोध्येतील व्यवसाय

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, राम मंदिरापासून ८ किमी अंतरावर पिझ्झा हट चालवणारे अवध कुमार वर्मा यांना आता आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. ते म्हणतात, 'पिझ्झा हटने तीन महिन्यांपूर्वी आपले शॉप सुरू केले, जेव्हा मंदिराच्या अभिषेक समारंभाची तारीख जाहीर झाली. गर्दीमुळे राम मार्गावरील आम्ही दुकाने पाहत होतो. आमचा व्यवसाय चांगला चालला आहे, पण तिथे दुकान असणं खूप फायदेशीर ठरू शकलं असतं.

दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल

१७ एप्रिल रोजी रामनवमीपर्यंत दर आठवड्याला १० ते १२ लाख भाविक अयोध्येत येतील असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. देशातील सुमारे ७ हजार प्रतिष्ठित नागरिकांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते.

पुढील बातम्या