Whatsapp News : व्हॉट्सॲपवरून आता कोणत्याही ॲपवर पाठवता येणार मेसेज! चॅटिंगची पद्धत बदलणार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Whatsapp News : व्हॉट्सॲपवरून आता कोणत्याही ॲपवर पाठवता येणार मेसेज! चॅटिंगची पद्धत बदलणार

Whatsapp News : व्हॉट्सॲपवरून आता कोणत्याही ॲपवर पाठवता येणार मेसेज! चॅटिंगची पद्धत बदलणार

Feb 08, 2024 09:26 AM IST

WhatsApp new feature : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सएप आपल्या मेसेज प्रणालीत मोठा बदल करणार आहे. क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंगची नवी सुविधा यूझर्सला दिली जाणार असून यामुळे व्हॉट्सॲपद्वारे इतर ॲप्समध्ये देखील आत मेसेज पाठवता येणार आहे.

WhatsApp New Features In Marathi
WhatsApp New Features In Marathi (HT)

WhatsApp new feature : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप आता संदेशवहनात एक मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सॲपच्या नव्या फीचर नुसार युझर्सना व्हॉट्सॲपद्वारे इतर मेसेजिंग ॲप्सवर देखील संदेश पाठविण्याचा पर्याय मिळणार आहे. यामुळे वापरकर्त्यांना एकाधिक ॲप्स डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही आणि एकाच ॲपद्वारे इतर मेसेजिंग ॲप्सवर चॅटिंग करणे शक्य होणार आहे. मात्र, या बदलाची प्रक्रिया सोपी होणार नाही.

पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान; नवाझ शरीफ चौथ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता

वायर्ड या मीडिया आउटलेटला दिलेल्या मुलाखतीत, व्हॉट्सॲपचे अभियांत्रिकी संचालक डिक ब्रॉवर यांनी सांगितले की प्लॅटफॉर्म इतर मेसेजिंग ॲप्सवर मेसेज पाठवता यावा या साठी योजनांवर काम करत आहे. सध्या, या बाबतची लॉन्च टाइमलाइन जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्म पुढील महिन्यात ही नवी प्रणाली लागू करण्याची शक्यता आहे. हे नव्या फीचरला मेसेजिंगचे भविष्य म्हटले जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू

ब्रॉवरच्या मते, कंपनी गेल्या दोन वर्षांपासून या नव्या फीचरवर काम सुरू आहे. वास्तविक, व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाला युरोपियन युनियन (EU) च्या डिजिटल मार्केट ॲक्ट अंतर्गत द्वारपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हा कायदा पुढील सहा महिन्यांत वापरकर्त्यांना मेसेजिंग साठी एकच ॲपचा पर्याय देतो. EU ची मागणी आहे की वापरकर्त्यांना एकाच ॲपवरून सर्वप्रकारच्या ॲपवर संदेश पाठवण्याचा पर्याय असावा.

Maharashtra Weather update : राज्यात उन पावसाचा खेळ! विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा इशारा, असे असेल हवामान

सुरक्षा राखणे हे मोठे आव्हान

क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंगचा पर्याय प्रदान करताना तांत्रिक अडचणींव्यतिरिक्त, या चॅट्स सुरक्षित ठेवणे आणि वापरकर्त्यांना गोपनीयता प्रदान करणे हे सर्वात मोठे आव्हान राहणार आहे. भिन्न प्लॅटफॉर्मवर सुरक्षेचे प्रोटोकॉल देखील भिन्न राहणार आहेत आणि गोपनीयता मानकांचे पालन करणे हे आव्हान राहणार आहे. त्यामुळे सुरुवातीला वापरकर्त्यांकडे फक्त मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा पर्याय असेल. यूजर्स ग्रुप चॅट किंवा कॉलिंग करू शकणार नाहीत.

कोणते प्लॅटफॉर्म लिंक होणार?

कोणत्या मेसेजिंग ॲप्सने त्याच्याशी लिंक-अप करण्यास सहमती दर्शवली आहे हे व्हॉट्सॲपने उघड केलेले नाही. मोठ्या मेसेजिंग ॲप्सने (जसे की स्नॅप, सिग्नल, टेलिग्राम आणि गुगल) व्हॉट्सॲपच्या या नवीन वैशिष्ट्याबाबत अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. Apple iMessage या लिंक-अपचा भाग बनतो की नाही हे पाहणे बाकी आहे. मात्र या नव्या पद्धतीमुळे युजर्सची चॅटिंगची पद्धत लवकरच बदलणार आहे हे निश्चित.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर