मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  INDIGO आणि AIR INDIA विमाने एकमेकांना धडकली, कोलकाता विमानतळावर मोठा अपघात टळला

INDIGO आणि AIR INDIA विमाने एकमेकांना धडकली, कोलकाता विमानतळावर मोठा अपघात टळला

Mar 27, 2024, 07:41 PM IST

  • Indigo air india :  दरभंगा जात असलेले इंडिगोचे एक विमान कोलकाता विमानतळावर रनवेवरून हळू हळू जात होते. त्यावेळी या विमानाने दुसऱ्या बाजुला उभ्या असलेल्या विमानाला धडक दिली.

कोलकाता विमानतळावर मोठा अपघात टळला

Indigo air india : दरभंगा जात असलेले इंडिगोचे एक विमान कोलकाता विमानतळावर रनवेवरून हळू हळू जात होते. त्यावेळी या विमानाने दुसऱ्या बाजुला उभ्या असलेल्या विमानाला धडक दिली.

  • Indigo air india :  दरभंगा जात असलेले इंडिगोचे एक विमान कोलकाता विमानतळावर रनवेवरून हळू हळू जात होते. त्यावेळी या विमानाने दुसऱ्या बाजुला उभ्या असलेल्या विमानाला धडक दिली.

कोलकाता एअरपोर्टच्या रनवेवर खळबळ माजली जेव्हा इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेस विमाने एकमेकांना धडकली. इंडिगो विमान टॅक्सी वे वरून जात होते आणि उड्डाण करण्यासाठी एअरपोर्टवरून ग्रीन सिग्रलच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान दुसऱ्या बाजुला एअर इंडिया एक्सप्रेस विमान रनवेवर उभे होते. विमानात शेकडो संख्येने प्रवाशी होते. दोन विमाने एकमेकांना धडकल्याने प्रवाशांमध्ये खळबळ माजली. मात्र या घटनेत कोणाही जखमी किंवा जिवीतहानीचे वृत्त नाही. डीजीसीएने प्रकरणात कारवाई करताना इंडिगोच्या दोन्ही वैमानिकांना नोकरीवरून काढन टाकले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा जात असलेले इंडिगोचे एक विमान कोलकाता विमानतळावर रनवेवरून हळू हळू जात होते. त्यावेळी या विमानाने दुसऱ्या बाजुला उभ्या असलेल्या विमानाला धडक दिली. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही विमानाचे पंख एकमेकांना धडकल्याने नुकसानग्रस्त झाले आहे. इंडिगो विमानाचे पंखाचा काही भाग तुटून रनवेवर पडले होते.

डीजीसीएने इंडिगो ए ३२० व्हीटी-आयएसएस विमानाच्या दोन्ही वैमानिकांना नोकरीवरून काढले आहे. त्याचबरोबर प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि इंडिगो एयरलायन्सच्या दोन्ही पायलटांना ऑफ-रोस्टर करण्यात आले आहे. ग्राउंड स्टाफशीही चौकशी केली जाईल. दोन्ही विमानाची उड्डाणे काही वेळासाठी थांबवली होती. 

इंडिगोच्या विमानात चार लहान मुलांसह १३५ प्रवासी होते. इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोलकाता विमानतळावर इंडिगो विमान आणि अन्य एका विमानात किरकोळ धडक झाली. विमान प्रोटोकॉलनुसार निरीक्षण आणि आवश्यक कारवाईमुळे दरभंगा जात असलेल्या प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.

पुढील बातम्या