मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agneepath योजनेबद्दल ७ प्रश्नांवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Agneepath योजनेबद्दल ७ प्रश्नांवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Jun 16, 2022, 04:36 PM IST

    • भारतीय लष्करात भरतीबाबत केंद्र सरकारकडून उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
अग्निपथ भरती योजना

भारतीय लष्करात भरतीबाबत केंद्र सरकारकडून उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

    • भारतीय लष्करात भरतीबाबत केंद्र सरकारकडून उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

केंद्र सरकारने लष्कराच्या भरती प्रक्रियेबाबत जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून विरोध केला जात आहे. अग्निपथ योजनेतून तरुणांना लष्करात (Indian Army) सेवेची संधी मिळणार आहे. या योजनेचा उद्देश हा देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि तरुणांना लष्करी सेवेची संधी देणे हा आहे. दरम्यान, देशभरातून या योजनेविरोधात सुरु असलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने या योजनेबाबत ७ प्रश्नांवर स्पष्टीकरण दिलं आहे. (fact About agneepath scheme for indian army recruitment)

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

अग्निवीरांचे भविष्य असुरक्षित आहे का?
ज्यांना व्यावसायिक व्हायचं आहे त्यांना आर्थिक पॅकेज आणि बँकेतून कर्जाची योजना आहे. तसंच शिकायचं असेल त्यांना १२ वी समकक्ष सर्टिफिकीट दिलं जाईल. तसंच शिक्षणासाठी ब्रिजिंग कोर्स असेल. नोकरी करण्याची इच्छा असलेल्यांनी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात, राज्य पोलिस दलात भरतीत प्राधान्य दिलं जाईल. याशिवाय इतर क्षेत्रातही नोकरीच्या संधी असतील.

तरुणांसाठीच्या संधी कमी होतील?
अग्निपथमुळे तरुणांना लष्करात नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होतील. येत्या काही वर्षात लष्करात अग्निवीरांची भरती हे सध्याच्या तीन पट होईल.

रेजिमेंटमधील बंधुभावावर परिणाम होणार का?
सध्याच्या योजनेमुळे रेजिमेटच्या व्यवस्थेत कोणताही बदल केलेला नाही. उलट यामुळे सर्वोत्कृष्ट अग्निवीरांची निवड होईल आणि युनिटमधील अंतर्गत समन्वय उत्तम होईल.

लष्कराच्या तिन्ही दलांच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होईल का?
बहुतांश देशात अशा पद्धतीने शॉर्ट टर्मसाठी सेवेची व्यवस्था आहे. तरुण आणि चपळ लष्कर हे सर्वात चांगली व्यवस्था मानली जाते. पहिल्या वर्षी अग्निवीरांची संख्या फक्त ३ टक्के असेल. याशिवाय ४ वर्षांनी पुन्हा भरती होण्यासाठी त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल.

लष्करासाठी २१ वर्षीय तरुण सज्ञान आणि विश्वसनीय नसतात का?
जगात लष्कर हे तरुणांवर अवलंबून आहे. अनुभवी लोकांच्या संख्येपेक्षा तरुण अधिक नसतील. सध्याच्या योजनेमुळे तरुण आणि अनुभवींचे प्रमाण समान ठेवण्यास मदत होईल.

अग्निवीर समाजासाठी घातक आणि दहशतवाद्यांना जाऊन मिळण्याचा धोका आहे का?
भारतीय लष्कराच्या मूल्यांचा, आदर्शाचा हा अपमान आहे. चार वर्षे लष्कराची वर्दी घातलेला तरुण आयुष्यभर देशासाठी कटिबद्ध राहील. आजही लष्करातून निवृत्त झालेले हजारो लोक आहेत ज्यांच्याकडे कौशल्य असले तरी त्यांनी देशाविरोधात वापरले नाही.

माजी लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली नाही का?
गेल्या दोन वर्षांपासून माजी लष्करी अधिकाऱ्यांसोबत यासंबंधी चर्चा कऱण्यात आली आहे. हा प्रस्ताव लष्करी अधिकारी विभागात अधिकाऱ्यांनीच तयार केला आहे. हा विभाग सरकारने स्थापन केला असून अनेक माजी सैनिक अधिकाऱ्यांनी या योजनेचं कौतुक केलं आहे.

पुढील बातम्या