मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'अग्निपथ'वरून आगडोंब; राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा

'अग्निपथ'वरून आगडोंब; राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा

Jun 16, 2022, 03:34 PM IST

    • देशात अनेक ठिकाणी लष्करी भरतीची तयारी करणारे उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या या भरती योजनेचा निषेध करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

देशात अनेक ठिकाणी लष्करी भरतीची तयारी करणारे उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या या भरती योजनेचा निषेध करत आहेत.

    • देशात अनेक ठिकाणी लष्करी भरतीची तयारी करणारे उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या या भरती योजनेचा निषेध करत आहेत.

केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या (Indian Army) तिन्ही दलात भरतीसाठी अग्निपथ भरती योजनेची (Agneepath Scheme) घोषणा केली. मात्र या घोषणेवरून देशभरात आता विरोध होत आहे. देशात अनेक ठिकाणी लष्करी भरतीची तयारी करणारे उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या या भरती योजनेचा निषेध करत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनाचा आगडोंब उसळला असून आता काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) इशारा दिला आहे. बिहारच्या अनेक जिल्ह्यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

मोदी सरकारने बेरोजगार असलेल्या तरुणांचा आवाज ऐकण्यासाठी आणि 'अग्निपथा'वर चालण्यासाठी त्यांच्या धैर्याची अग्निपरीक्षा घेऊ नये असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं की, "कोणतीही रँक नाही, कोणतीही पेन्शन नाही. दोन वर्षांपासून भरती नाही, ४ वर्षानंतर स्थिर भविष्य नाही." तसंच सरकारला लष्कराबद्दल आदर नसल्याचंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही अग्निपथ योजनेवरून सरकारवर टीकास्र सोडले आहे. त्यांनी केंद्रावर निशाणा साधताना म्हटलं की, "लष्करात भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात देशसेवा, आई वडिलांची सेवा, घर, भविष्य यांची स्वप्ने असतात. नव्याने लष्कर भरतीच्या या योजनेतून त्यांना काय मिळणार? ४ वर्षांनी हातात नोकरीची शाश्वती नाही, पेन्शनची सुविधा नाही. रँक नाही, पेन्शन नाही. तरुणांच्या स्वप्नांना असं चिरडू नका मोदीजी"

केंद्र सरकारने भारतीय लष्करातील भरतीच्या प्रक्रियेत मोठा बदल करताना अग्निपथ भरती योजनेची घोषणा मंगळवारी केली. या योजनेंतर्गत चार वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल. तिन्ही दलात यंदा या योजनेंतर्गत ४६ हजार पदांसाठी भरती होणार आहे. १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना भरीत होता येणार आहे.

पुढील बातम्या