मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IIT BHU GangRape: बंदुकीच्या धाकावर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, भाजप आयटी सेलच्या तिघांना अटक

IIT BHU GangRape: बंदुकीच्या धाकावर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, भाजप आयटी सेलच्या तिघांना अटक

Dec 31, 2023, 09:30 PM IST

    • IT BHU Rape Case Updates: आयआयटी बीएचयूमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
IIT BHU GangRape

IT BHU Rape Case Updates: आयआयटी बीएचयूमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

    • IT BHU Rape Case Updates: आयआयटी बीएचयूमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

IT BHU Rape Case: आयआयटी बीएचयूमध्ये १ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्यरात्री एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तिघेही आरोपी भाजपशी संबंधित आहेत. बलात्काराच्या घटनेनंतर तब्बल ६० दिवसानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. घटनेदरम्यान, तिन्ही आरोपींनी पीडिताला कपडे काढायला सांगून तिचा व्हिडिओ काढल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर आयआयटीच्या कॅम्पसमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली जात आहे, यासाठी विद्यार्थ्यांनी निदर्शने देखील केली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

big solar storm will hit earth : पृथ्वीवर धडकणार भीषण सौर वादळ! अनेक देश बुडणार अंधारात; काय होणार परिणाम

Covishield : कोविशिल्डच्या धोक्याबद्दल एस्ट्राझेनकाने २०२१ मध्येच सांगितलं होतं, सीरमने केला खुलासा

WhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही 'हे' काम

Elon Musk : अमेरिकन नागरिकांची भूमिका आलेली २०२४ची शेवटची निवडणूक! एलोन मस्क का म्हणाले असे ? वाचा

अभिषेक चौहान, कुणाल पांडे आणि सक्षम पटेल अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी बीएचयूमध्ये न्यू गर्ल हॉस्टेलमधील एक विद्यार्थिनी तिच्या एका मित्रासह १ नोव्हेंबरला रात्री दीड वाजताच्या सुमारास शतपावली करण्यासाठी निघाली. त्याचवेळी एका दुचाकीवरून तीन अज्ञात तरुण आयआयटीच्या कॅम्समध्ये घुसले. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना वेगळे केलं. त्यानंतर या तरुणांनी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. आरोपींनी या घटनेचा अश्लील व्हिडिओ देखील बनवला. तसेच आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि पीडिताचा मोबाईल हिसकावून घेतला.

काशी झोनचे डीसीपी आरएस गौतम यांनी सांगितले की, “आरोपींना लंका पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या घरातून पकडले. घटनेत वापरलेल्या गोळ्या आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. प्रत्येकाने घटनेच्या वेळेचे व्हिडिओ डिलीट केले होते. प्रत्येकाने आपला गुन्हा मान्य केला. चौकशीनंतर सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी हे तिघेही चेतगंजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तेच फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावेळी त्याला संशयित म्हणून चिन्हांकित करण्यात आले होते परंतु कोणतीही पुष्टी नव्हती. त्यामुळे पोलिसांनी खातरजमा करून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल पांडेचे वडील जितेंद्र पांडे यांचे निधन झाले. त्यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र, तो बेरोजगार आहे.आनंद उर्फ ​​अभिषेक चौहानचे वडील मुन्ना पॉवरलूम चालवतात. आनंद दहावी पास आहे. सक्षमचे वडील विजय पटेल हे खासगी नोकरी करतात. तो इंटरमिजिएट उतीर्ण आहे. तिघेही एकत्र राहतात आणि बीएचयू येथे रात्री फिरायला जात असे.

विभाग

पुढील बातम्या